बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘कोरोनाचे उपचार घेताना रूग्णालयात आईसोबत….’; मुलीने केंद्रीय मंत्री स्मृती इराणींकडे रडत-रडत केली तक्रार

नवी दिल्ली | कोरोना संकटाच्या काळात अनेकांनी आपला जीव गमावला. या संकटाचा सामना करण्यासाठी डॉक्टर्स, सिस्टर, पोलीस कर्मचारी आपल्या जीवाची बाजी लावत आपलं कर्तव्य पार पाडत आहेत.  असं असताना काहीजण माणुसकीला काळीमा फासणारं करणारं कृत्य करत आहेत. अशातच एका मुलीने लखनऊच्या डॉ. राम मनोहर लोहिया इन्स्टिट्यूटमधील स्टाफवर गंभीर आरोप केला आहे.

अमेठीमधील एका 40 वर्षाची महिलेची प्रकृती खराब झाल्यावर त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यांची तब्येत आणखीन ढासळल्यामुळे त्यांना कुटुंबीयांनी डॉ. राम मनोहर लोहिया इन्स्टिट्यूटमध्ये दाखल केलं. तिथे आल्यावर महिलेची कोरोना चाचणी केली. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. कोरोना रूग्णालय असल्यामुळे त्यांना कुटंबियांपासून दूर ठेवण्यात आलं. मात्र बऱ्याच दिवसांनंतर रूग्णाला भेटण्याची परवानगी मिळाली.

कुटुंबीय भेटले तेव्हा त्यांची प्रकृती खालावत चाललेली होती. यावेळी महिलेने डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी मला मारहाणीसह अत्याचार केल्याचं सांगितलं. त्यानंतर शुक्रवारी डिस्चार्ज घेत महिलेला गौरीगंज येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात केलं. अमेठी दौऱ्यावर असलेल्या स्मृती  इराणी यांच्याकडे पीडित महिलेच्या मुलगी आली तिने आपल्या आईसोबत झालेल्या प्रकाराबाबत माहिती दिली.

दरम्यान, माझ्या आईसोबत छेडछाड झाली असल्याचं तिने सांगितलं. त्यानंतर स्मृती इराणींनी याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले.

थोडक्यात बातम्या- 

घरच्यांनी केलं वेगळं तरी पुर्ण केली प्रेम कहाणी, रेल्वेच्या टाॅयलेटसमोर केलं प्रियकरासोबत लग्न

ठाकरे सरकारमधील मुख्यमंत्रिपद वाटण्याबाबत संजय राऊतांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

भारतातील कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात; रूग्णसंख्येत लक्षणीय घट

10वी नापास रिक्षाचालकाची अजब प्रेम कहाणी, आता राहतो स्वीत्झर्लंडमध्ये

‘या’ शहरातील लग्नावरील निर्बंध उद्यापासून हटणार; हॉटेलही पूर्ण क्षमतेने होणार सुरू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More