पोरीचं धाडस बघा! थेड स्टेडियममध्येच शुभमनला केलं प्रपोज

नवी दिल्ली | अगदी कमी कालावधीत क्रिकेटपटू शुभमन (Shubman) गिलने अनेकांना भुरळ पाडली आहे. अनेक विक्रम सध्या शुभमननं केले आहेत. सध्या त्याची प्रचंड हवा आहे. शुभमनची सगळीकडं चर्चा आहे मात्र दुसरीकडे सोशल मिडियावर एका मिस्ट्री गर्लची चर्चा सुरु आहे.

ही शुभमनची मोठी चाहती दिसत आहे. या मुलीनं हातात एक पोस्टर घेतलं आहे. त्या पोस्टरवर लिहलेल्या वाक्यामुळं ती जास्त चर्चीली जात आहे. त्या प्ले कार्डवर त्या मुलीनं ‘टिंडर शुभमनसोबत मॅच करुन दे’ असं लिहलं आहे. शुभमनला डेट करण्याची इच्छा असणाऱ्या या मुलीनं डायरेक्ट टिंडर (Tinder) या डेटींग अ‌ॅपला साकडं घातलं आहे.

हा फोटो अहमदाबाद (Ahmedabad) येथील नरेंद्र मोदी स्टेडियम (Narendra Modi Stadium) येथील आहे. बुधवारी झालेल्या न्युझीलंड(New Zealand) विरुद्ध भारत(India) सामन्यात ही तरुणी दिसून आली. जी सध्या व्हायरल होत आहे. या मुलीचा हा फोटो पूर्व क्रिकेटर आकाश चोप्रा (Akash Chopra) यांनी ‘हर दिल मे गिल’ या कॅप्शननं ट्विट् केलं आहे.

या सामान्यात गिल आणि परीच्या जोरावर चार गडी गमावून 234 धावा केल्या. भारताने न्यूझीलंडचा 168 धावांनी पराभव केला. गिलच्या कामगिरीमुळं त्याला त्याच्या खेळीसाठी सर्वोत्तम खेळाडू (best player) म्हणून घोषित करण्यात आलं. गिल तिन्ही फाॅरमॅटमध्ये शतक झळकवणारा पाचवा भारतीय फलंदाज (batsman) ठरला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More