बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

प्रेमप्रकरणातून ती चार जणांसोबत पळाली; कुणासोबत लग्न करु?, असा प्रश्न पडल्यानंतर घडला विचित्र प्रकार

लखनऊ | प्रेमप्रकरणात अनेकदा मुलं मुली घरातून पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतात. आजकालच्या जगात हा एक ट्रेंड होत चालला आहे. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशातील टांडा येथील अजीमनगर परिसरात घडला आहे. एक मुलगी एकत्र चार जणांसोबत घरातून पळून गेली. मात्र लग्न कोणासोबत करावं हेच नेमक तिला कळत नव्हते. शेवटी या प्रकरणात विचित्र पद्धतीने वर परीक्षण करण्यात आलं.

काही दिवसांपूर्वी परीसरातील एक तरुणी चार तरुणांसोबत लग्न करण्यासाठी घरातून पळून गेली. या तरुणांनी दोन दिवस त्या तरुणीला आपल्या नातेवाईकांकडे लपवून ठेवले. मात्र, दोन दिवसांनंतर या तरुणीला शोधण्यात तिच्या आई-वडिलांना यश आलं. त्यानंतर हे प्रकरण पंचायतीकडे निवाड्यासाठी गेलं.

निवाड्यावेळी पंचायतीने लग्नाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. त्या तरुणीला जेव्हा लग्नासाठी विचारण्यात आलं तेव्हा मात्र, ती नक्की कोणासोबत लग्न करायचं या संभ्रमात पडली. विशेष म्हणजे चार तरुणांपैकी एकही तरुण लग्न करण्यासाठी स्वत:हून तयार झाला नाही, त्यामुळे या प्रकरणातील पेच आणखी वाढला.

तरुणी आणि चारही तरुणांना दोन दिवसांचा अवधी देण्यात आला, मात्र ते कोणताही निर्णय घेण्यात अपयशी ठरले. त्यामुळे पंचायतीने चिट्ठ्या उधळून लग्नाचा निर्णय घेतला. या वेळी चारही तरुणांच्या नावाच्या चिट्ठ्या उधळण्यात आल्या, आणि ज्या तरुणाचं नाव चिट्ठीत येईल त्याच्यासोबत तरुणीला लग्न करावं लागेल असा निर्णय सर्वांच्या अनुमतीने घेण्यात आला. दरम्यान, संपूर्ण परीसरात सध्या तरुणीची आणि तिच्या लग्नासाठी घेण्यात आलेल्या अजब वर परीक्षणाची चर्चा रंगत आहे.

थोडक्यात बातम्या-

बुधवारनंतर गुरुवारी पुण्यात कोरोना रुग्णसंख्येत धक्कादायक वाढ, जाणून घ्या आकडेवारी

‘त्या’ प्रकरणावरुन अजित पवारांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनाच फटकारलं!

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत घडला धक्कादायक प्रकार, सिनेमात सेक्स वर्कर म्हणून दाखवलं!

“पळपुट्या मुख्यमंत्र्यांना सैनिकांनी देशासाठी दिलेलं योगदान कसं कळणार?”

एलन मस्क यांच्या सर्वात वेगवान इंटरनेटसाठी बुकिंग सुरु, पाहा कसं करायचं रजिस्ट्रेशन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More