महाराष्ट्र मुंबई

खळबळजनक! नालासोपाऱ्यात घराबाहेर पाण्याचा पाईप लावण्यासाठी गेलेल्या मुलीला उचलून तिच्यावर बलात्कार

मुंबई | घराबाहेर पाण्याचा पाईप लावण्यासाठी गेलेल्या मुलीला नराधमांनी जबरदस्तीने उचलून नेलं. एका मोकळ्या जागेत उभ्या असलेल्या टेम्पोत नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नालासोपाऱ्यात घडली आहे.

जीवे मारण्याची धमकी देऊन 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला. या बलात्काराच्या घटनेनं नालासोपारा हादरलं आहे.

मुलीच्या आरडाओरड्यामुळे ही घटना उघडकीस आली. मात्र तोपर्यंत बलात्कार करून आरोपी फरार झाले. ही धक्कादायक घटना शुक्रवारी 8 जानेवारीला रात्री 9 च्या सुमारास घडली.

दरम्यान, याप्रकरणी वसईतील वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. गेल्या काही दिवसापासून बलात्कारासारख्या घटनांचं सत्र वाढलं आहे.

थोडक्यात बातम्या-

इच्छा नसताना दबावामुळे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्विकारली; नितीश कुमारांचा खुलासा

भारतीय खेळाडूंवरील वर्णद्वेषी टीकेवरुन सचिन तेंडुलकरचा संदेश, म्हणाला…

कृषी कायद्यांना स्थगिती मिळणार?; शेतकरी आंदोलनाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

‘चिकन, अंडी खाणार असाल तर…’; बर्ड फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन मंत्र्यांचा जनतेला मोलाचा सल्ला

‘फडणवीस नितेश राणेंना तुरुंगात टाकणार होते, पण…’; शिवसेना नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या