बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘बिग बाॅस 15’ मध्ये ‘हा’ प्रसिद्ध चेहरा दिसणार; पहिल्या स्पर्धकाचं नाव जाहीर

मुंबई | नेहमीच चर्चेत असलेला टीव्हीवरील लोकप्रिय शो म्हणजे ‘बिग बाॅस’. यावर्षी बिग बाॅस 15 हा कार्यक्रम तीन महिन्यांऐवजी सहा महिने चालणार आहे. तसेच हा कार्यक्रम सहा आठवडे ओटीटी प्लॅटफॉर्मवरून प्रसारित केला जाणार आहे. चाहते नव्या सीझनसाठी भरपूर उत्सुक असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता बिग बाॅस 15 च्या पहिल्या स्पर्धकाची झलक समोर आली आहे.

दिवसेंदिवस नव्या पर्वाबद्दल काही ना काही नवीन गोष्टी समोर येत असतात. आत्ता चाहत्यांची उत्सुकता पुन्हा एकदा वाढली आहे. कारण नुकताच ‘बिग बॉस 15’च्या पहिल्या स्पर्धकाचं नाव समोर आलं आहे. बिग बाॅस 15 ची पहिली स्पर्धक प्रसिद्ध गायिका नेहा भसीन असणार आहे.

बिग बाॅस 15 चा पहिला स्पर्धक म्हणून प्रसिद्ध गायिका नेहा भसीनचं नाव जाहीर करण्यात आलंय. वूट सिलेक्टवर नेहाचा परिचय देणारा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओतून तीचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळत आहे. याशिवाय़ नेहा ‘बाजरे दा सिट्टा’ हे गाणे गाऊन घरात प्रवेश करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, यावर्षी नेहमीप्रमाणं सूत्रसंचालनाची धुरा सांभाळताना सलमान खान दिसणार नाही. मात्र त्याच्याऐवजी करण जोहर ही जबाबदारी पार पडणार असल्याचं समजतंय. हा शो टीव्हीवर प्रसारित होण्याच्या 6 आठवड्यांपूर्वी वूटवर प्रदर्शित होणार आहे.

थोडक्यात बातम्या –

“भेदभाव न करता मदत करा, मोठाभाऊ म्हणून जबाबदारी घ्या”

मास्टरशेफ संजीव कपूर यांचा पूरग्रस्तांना मदतीचा हात; दररोज 15 हजार थाळ्या पुरवणार

आसाम-मिझोराम वाद चिघळला; मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल

सोन्या चांदीच्या दरात पुन्हा वाढ; वाचा आजचे ताजे दर

शेतकऱ्याला राग अनावर; भररस्त्यात भाजप नेत्याचे कपडे फाडले, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More