बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अकोल्यात चक्क बकऱ्यांची बँक! ‘गोट बँक ऑफ कारखेडा’ या बँकेचं काम जाणून घ्या तूम्हीही व्हाल थक्क

अकोला | अकोल्यात दोन वर्षांपूर्वी अतिशय भन्नाट कल्पनेतून एका वेगळ्या संकल्पनेची बँक स्थापन करण्यात आली  आहे. राज्यासह देशाच्या ग्रामीण भागात आमुलाग्र आणि क्रांतीकारी बदल घडवून आणणारी ही बँक आहे. या बँकेत पैशांचा कोणताही व्यवहार होत नाही. मात्र, तरीसुद्धा येथील व्यवहार तुम्हाला लखपती आणि करोडपती बनवणारा आहे.

आतापर्यंत अनेक ठिकाणी अनेक बँका स्थापन करण्यात आल्या आहेत. ब्लड बँक, वॉटर बँक, मिल्क बँक, बुक बँक, पैशांच्या बँक. मात्र, अकोल्यात चक्क बकऱ्यांची बँक स्थापन करण्यात आली आहे. ग्रामीण भागात बदल घडविणाऱ्या या बँकेचं नाव आहे ‘गोट बँक ऑफ कारखेडा’ ही बँक अकोला जिल्ह्यातील सांगवी मोहाडी गावात आहे.  नरेश देशमुख हे या ‘गोट बँक ऑफ कारखेडा’चे संस्थापक अध्यक्ष आहेत, त्यांनी सांगितलं या बँकेत कर्जात बकरीच मिळते. व्याजही अगदी बकरीच्याच स्वरूपात भरावं लागतं. डिपॉझिटही बकरीच्याच स्वरूपात आणि बकरीच्या डिपॉझिटवरचं व्याजही तुम्हाला बकरीच्याच स्वरूपात मिळतं.

बँक सुरू करण्याची प्रेरणा नरेश देशमुख यांना आपल्या कारखेडा गावातील एका शेतमजुरामूळे मिळाली. या शेतमजुराने शेतमजुरीतून जोडलेल्या पैशांतून काही बकऱ्या विकत घेतल्या. कुटुंबांची आर्थिक परिस्थिती चांगली नसतांना या शेतमजुराने सगळ जुळवून आणलं होतं. फक्त आपल्या बकऱ्यांच्या बळावर. याच घटनेनं 4 जुलै 2018 मध्ये या बँकेची संकल्पना प्रत्यक्षात उतरली, असं नरेश देशमुख यांनी सांगितलं.

दरम्यान,  सव्वा लाखांच्या कर्जावर गावानं तब्बल 16 लाखांची कमाई केली आहे. गावातील अनेक कुटुंब यातून आता लखपती झाले आहेत. राज्य सरकारनंही गोट बँकेच्या या उपक्रमाचं कौतूक केलं आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी पालघर, अकोला आणि अमरावती या तीन जिल्ह्य़ांत शेळी बॅंकेचा प्रकल्प राबवण्याचा निर्णय राज्य सरकारने केला आहे.

थोडक्यात बातम्या

ट्रायडंट हॉटेलमध्ये 100 दिवसांचं बुकिंग; सचिन वाझे प्रकरणात एनआयएचा मोठा खुलासा

देवेंद्र फडणवीस हे सह्याद्री आणि मोदींपेक्षाही मोठे नेते, पण…- संजय राऊत

संतापलेल्या हत्तीचा फोटो काढणं बेतलं असतं जिवावर, पाहा व्हिडिओ

‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर 20 पैशांत धावेल एक किलोमीटरपर्यंत; जाणून घ्या किंमत

सुप्रिया सुळे यांनी घेतली सोनिया गांधींची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More