आता सरकार देणार 300 रूपयांमध्ये भाड्याने घर!

जयपूर | तुम्हाला स्वस्त भाड्यात फ्लॅट (Flat) घ्यायचा असेल तर तुम्ही सरकारी फ्लॅट (Goverment Flat) सहज भाड्याने घेऊ शकता. यासाठी तुम्हाला फक्त 300 रुपये भाडं द्यावं लागणार आहे.

आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता अशोक गेहलोत (Ashok Gehlot) सरकारने दरमहा 300 रुपये भाड्याने सरकारी निवासस्थान देण्याचा निर्णय घेतला आहे.

परवडणाऱ्या गृहनिर्माण योजनेअंतर्गत बांधण्यात आलेले हे फ्लॅट असतील. आणि भाडे करार देखील अशा प्रकारे तयार केला जाईल की भाडेकरू 10 वर्षांनंतर मालमत्तेचा मालक होईल आणि त्याच्या सध्याच्या किमतीची फक्त शिल्लक रक्कम देईल.

मनी 9 च्या अहवालानुसार जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुमचं वार्षिक उत्पन्न 3,00,000 रुपयांपेक्षा कमी असलं पाहिजे, कारण केवळ 3 लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेली कुटुंबेच या योजनेसाठी पात्र आहेत.

परवडणाऱ्या घरांच्या योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या मालमत्ता अनेक वर्षांपासून रिकाम्या पडून आहेत. त्यांचा उपयोग करून राजस्थानमधील दुर्बल घटकांची सेवा करण्याची योजना आहे.

महत्त्वाच्या बातम्या-