Top News पुणे महाराष्ट्र

पुण्यातील ‘या’ भागात विद्यार्थ्यांसाठी सरकार 9 मजली भव्य वसतीगृह उभारणार!

Photo Courtesy- Facebook/Uddhav Thackeray

पुणे | पुण्यात शिक्षणासाठी हजारो आदिवासी जमातीतील विद्यार्थी येतात. अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांकडून वसतीगृहाची मागणी केली जात होती. याची दखल घेत आदिवासी विकास मंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतीगृह उभारण्याचा निर्णय घेतल्याचं कळतंय.

पुण्यातील हडपसर भागात हे वसतीगृह उभारलं जाणार असल्याची माहिती आहे. तसेच राज्य शासनाने या वसतीगृह इमारत बांधकामाच्या अंदाज पत्रकास प्रशासकीय मान्यता दिल्याचं समजतंय.

आदिवासी मुलांच्या वसतीगृहाची इमारत नऊ मजली असणार आहे. यामध्ये इयत्ता आठवी ते पदव्युत्तर पदवीपर्यंतच्या सुमारे साडेसहाशे विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती आहे.

हडपसर भागातील मौजे महंमदवाडी येथे आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृहाची इमारत बांधण्यात येणार आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी 44 कोटी 85 लाख अंदाजे खर्च येणार असल्याचं बोललं जात आहे.

थोडक्यात बातम्या-

‘लिहून घ्या, …त्यानंतर महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस’; भाजपच्या या आमदाराने सांगितली वेळ!

…म्हणून पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणेला पुन्हा अटक

मुलीनं काही बरं वाईट केलं तर त्याला राष्ट्रवादीचा नेता जबाबदार- तृप्ती देसाई

रिहानाचा ‘हा’ टाॅपलेस फोटो पाहून राम कदम संतापले, म्हणाले…

“शिवसेना-काॅंग्रेस-राष्ट्रवादीसाठी स्त्री-दाक्षिण्य केवळ भाषणात बोलायचे मुद्दे”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या