बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ ठिकाणी उभारणार छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक

पुणे | स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांचे लवकर पुण्यात भव्य स्मारक उभारले जाणार आहे. या स्मारकाच्या कामाला आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी तत्वत: मंजूरी दिली आहे. त्यामुळे आता शिवप्रेमी आनंद व्यक्त करत आहे.

पुण्यातील हवेली तालुक्यातील वढु बुद्रुक (Vadhu Budruk) या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारले जाणार आहे. स्मारकाचं काम करताना स्थानिकांशी चर्चा करुन आणि त्यांना विश्वासात घेऊन काम करावं. तसेच स्मारकाचे काम करताना छत्रपती संभाजी महाराजांच्या समकालीन वास्तुरचना यांचा आधार घ्यावा, अशा सुचना अजित पवारांनी दिल्या आहेत.

छत्रपती संभाजी महाराज म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. ते महाराष्ट्राची अस्मिता आहेत. स्वराज्याच्या विस्तारासाठी आणि रक्षणासाठी संभाजी महाराजांनी दिलेलं योगदान हे अतुलनीय आहे, असं अजित पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, वढु बुद्रुक येथे संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी अनेक लोक येत असतात. मागील काही वर्षापासून अनेक शिवप्रेमींची भेट देण्याची संख्या वाढली आहे. त्यामुळे या ठिकाणी गैरसोय होत होती. अशातच या ठिकाणी स्मारक उभारण्याची मागणी होत आहे.

थोडक्यात बातम्या-

भारतीयांसाठी धोक्याची घंटा! लसीकरण झालेल्या लोकांना ओमिक्राॅनचा धोका

“त्यांचं वाटोळं करताना तुम्हाला लाज कशी वाटली नाही?”

“…त्यावेळी माझ्या बापाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही”

वेळीच ओळखा Omicron; ‘ही’ लक्षणं असतील तर लगेच टेस्ट करा!

अल्लु अर्जून आणि रश्मिकाच्या ‘पुष्पा’चा चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ, केली ‘इतक्या’ कोटी रुपयांची कमाई

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More