बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भर रस्त्यात माथेफिरुचा चौघांवर चाकू हल्ला; एका व्यक्तीचा मृत्यु, तीन जण गंभीर जखमी

औरंगाबाद | औरंगाबाद शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील अंगूरीबाग परिसरात मंगळवारी मध्यरात्री एका माथेफिरुने चार व्यक्तींवर चाकू हल्ला केला आहे. या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी आहेत.

मंगळवारी मध्यरात्री अंगूरी बाग परिसरात नितीन उर्फ गब्या खंडागळे या माथेफिरुने दानिश सय्यद, शेख सलीम, शेख बाबा आणि शेख जब्बार यांच्यावर चाकूच्या सहाय्याने प्राणघातक हल्ला केला. हल्ला झालेल्या चौघांपैकी दानिश सैय्यद हा तरुण मृत्युमुखी पडला आहे आणि इतर तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सदरील प्रकरणात औरंगाबादच्या क्रांती चौक पोलीस ठाण्यात नितीन खंडागळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या माथेफिरू हल्लेखोराला औरंगाबाद पोलिसांनी अटक केली आहे. यापूर्वीही रत्नागिरीत अशाच एका माथेफिरूने कोयत्याने हल्ला करून सात लोकांना जखमी केलं होतं ज्यामध्ये लहान मुलाचा देखील समावेश होता.

अशा प्रकारच्या घटनांना रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाला कडक पाउले उचलून कायद्याची भीती अशा नराधमांच्या मनात निर्माण करण्याची गरज आहे. तसेच औरंगाबाद शहरात झालेल्या या प्रकरणामुळे सामान्य नागरिकांच्या मनात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

थोडक्यात बातम्या

विरोधकांनी मनसुख हिरेन प्रकरण राजकीय प्रतिष्ठेचं करू नये- संजय राऊत

‘सॉरी, तुला खूप त्रास दिला…’; नेटकऱ्यांनी मागितली रिया चक्रवर्तीची माफी

सचिन वाझेंच्या राजीनाम्यावरून ठाकरे सरकारमध्ये दोन गट; राजकीय दबाव वाढला!

स्त्री होण्यासाठी पुरूष करतायेत लिंग बदल; गुजरातमध्ये लिंगपरिवर्तनाचा वाढतोय ट्रेंड

एवढी काळजी त्यांनी आधीच केली असती तर…- ज्योतिरादित्य शिंदे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More