बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

प्रेयसीने प्रियकराच्या घरासमोर घेतला शेवटचा श्वास; ह्रदय पिळवटून टाकणारी घटना!

लखनऊ | सध्याची तरुणपिढी प्रेमात अनेक वेळा टोकाचं पाऊल उचलत असल्याचं आपण पाहतो. मात्र एका घटनेनं सर्वांना हैराण करुन सोडलं आहे. प्रेमसंबंधांमध्ये असलेल्या प्रेयसीने प्रियकराच्या घरासमोर आपला शेवटचा श्वास घेतला आहे. या घटनेनंतर संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमध्ये संबंधित प्रेयसी गंभीररित्या जखमी झाली असून तिचा जागीच मृत्यू झाला आहे.

संबंधित घटना ही उत्तर प्रदेशच्या बलरामपूरमधील आहे. प्रेमसंबंधांमध्ये असलेल्या प्रियकराचं नाव संजयकुमार देवांगन असं असून तो 23 वर्षांचा आहे. तर त्याची प्रेयसी ही 19 वर्षांची होती. दोघेही गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंधांमध्ये होते. मात्र काही दिवसांपुर्वी त्यांच्यात वाद होऊ लागला. यातूनच युवती प्रियकराच्या घरी आली.

संबंधित प्रेयसीने आपल्या प्रियकराच्या घराबाहेर धक्कादायक कृत्य केलं आहे. प्रेयसीने आपल्या प्रियकराच्या घराबाहेर आपल्या अंगावर पेट्रोल ओतून स्वतःलाच पेटवून घेतलं. यातच ती गंभीरपणे जखमी होऊन जागीच मृत पावली. यानंतर प्रेयसीच्या वडिलांनी प्रियकराच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे.

दरम्यान, प्रेयसीच्या वडिलांनी त्यांच्या लेकीच्या प्रियकराविरुद्ध जरी तक्रार नोंदवली असली तरी त्याला कोरोनाची लागण झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या कारणामुळे अद्याप प्रियकराला ताब्यात घेण्यात आलेलं नाहीये. आता पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. याबाबतची संपुर्ण माहिती पोलीस अधिकारी धुर्वेश जयस्वाल यांनी दिली आहे.

थोडक्यात बातम्या-

रक्षकच बनला भक्षक! पती कोरोनामुळे रुग्णालयात असल्याची संधी साधत पोलिसाने केला महीलेवर बलात्कार

“भाजपनेच मराठा आरक्षण दिलं आणि संभाजीराजेंना खासदारही केलं”

संतापजनक! वरातीसोबत आलेल्या तरुणाने घरात घुसून अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार

‘या’ शिवसेना आमदाराची गाडी त्यांच्याच घरासमोर पेटवण्याचा प्रयत्न

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात रोमांचक सामन्यावर राजस्थान राॅयलचं मजेशीर ट्विट

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More