बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ह्रदय पिळवटून टाकणारी घटना; मृत मुलाच्या आठवणीत आई चितेच्या राखेतच झोपते

गांधीनगर | गुजरातमधील ह्रदय पिळवटून टाकणारी एक घटना समोर आली आहे. कोरोना काळात अनेक लोक आपल्या सर्वात जवळची नाती गमवत आहे. अशातच मुलाच्या मृत्यूने व्याकूळ झालेली एक आई त्याच्या आठवणीत त्याच्या चितेच्या राखेवर जाऊन झोपत असल्याचं समोर आलं आहे.

संबंधित घटना ही गुजरातमधील जुनीरोह गावातील आहे. येथे रहिवासी असणाऱ्या मंगूबेन चव्हाण यांनी 4 महिन्यांपुर्वी एका दुर्दैवी अपघतात आपल्या मुलाला गमावलं. मात्र मुलाच्या विरहात ही माऊली प्रचंड व्याकूळ झाली असून जेव्हा-जेव्हा यांना आपल्या मुलाची आठवण येते, तेव्हा-तेव्हा त्या आपल्या मुलाच्या चितेच्या राखेवर जाऊन झोपतात.

आपल्या मुलाच्या चितेच्या राखेवर जाऊन झोपणे, हे अलीकडे या माऊलीचा दिनक्रमच झाला आहे. मंगूबेन घरातून गायब झाल्या की घरातील सगळे मुलाच्या आग्नीच्या ठिकाणी धाव घेतात आणि त्यांना घरी आणतात.

दरम्यान, या माऊलीचं दुःख आता गावातील लोकांना देखील बघवत नाही. अनेकांनी त्यांना समजवण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र ते लोक अयशस्वी ठरले. या घटनेनंतर सर्वत्र एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक लोक तसेच घरातील लोक मंगूबेन यांना सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र मंगूबेन यांच्यात कसलीच सुधारणा होताना दिसत नाहीेये.

थोडक्यात बातम्या- 

4 मित्रांनी सरकारी मदतीची वाट न पाहता उभारलं 50 बेड्सचं कोविड सेंटर!

सर्व पत्रकार आणि कॅमेरामन यांना फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करा- देवेंद्र फडणवीस

“पवार साहेब, दारुवाल्यांसाठी तुम्ही कळकळीने पत्र लिहिले पण…”

हसतं-खेळतं घर कोरोनामुळे उद्ध्वस्त; एकाच दिवशी दोन्ही मुलांचा मृत्यू

“मराठा आरक्षणासाठी 2 दिवसीय विशेष अधिवेशन बोलवा”; ‘या’ माजी विधानसभा अध्यक्षांची मागणी

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More