बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…अन् लेकीचं शीर कापून तो थेट पोलीस ठाण्याकडे निघाला; घडलेला प्रकार पाहून पोलिसही हादरले

लखनऊ | उत्तरप्रदेशात हरदोई जिल्ह्यात ह्रदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. एक व्यक्ती त्याच्या हातात एका मुलीचं कापलेलं शीर घेऊन रस्त्याने चालत होता. हे भयानक दृश्य बघून रस्त्यावरची येणारी जाणारी लोकं प्रचंड घाबरली होती. काय करावं त्यांना काहीच सुचत नव्हतं. तेव्हा एकाने पोलिसांना फोन करून या प्रकाराची माहिती दिली. सदर प्रकाराबद्दल माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले.

पोलीस घटनास्थळी आल्यावर त्यांनाही समोरचं चित्र पाहून धक्का बसला. एक व्यक्ती 17 वर्षाच्या मुलीचं धडापासून वेगळं केलेलं शीर हातात घेऊन रस्त्यानं चालत होता. त्यावेळी उपस्थित दोन पोलिसांपैकी एकाने हे दृश्य फोनमध्ये रेकाॅर्ड केलं. पोलिसांनी त्या व्यक्तीला थांबवून त्याचं नाव काय आहे? राहणारा कुठला आहे? हातात असलेलं शीर कोणाचं आहे? असे अनेक प्रश्न विचारले. आरोपीचं नाव सर्वेश असून त्याने सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी शांततेत दिली.

पोलिसांनी त्याला प्रश्न विचारले असता, त्यानं सांगितलं हे शीर माझ्याचं 17 वर्षाच्या मुलीचं आहे. तिचे बाहेर एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते, हे कळाल्यावर मला राग अनावर झाला. त्यानंतर रागाच्या भरात मी हत्या केली. हे करत असतांना त्यावेळी आजूबाजूला कोणीही नव्हतं अशीही कबुली त्याने पोलिसांना दिली. मी घराची आतून कडी लावली आणि तिचं डोकं धडापासून वेगळं केलं. तिचं धड घरात पडलेलं आहे, असं आरोपी सर्वेशने पोलिसांना सांगितलं.

घटनेदरम्यान पोलिसांनी त्याच्या हातातलं शीर घेऊन बाजूला ठेवलं, त्याला रस्त्याच्या कडेला बसवलं पण त्याने त्यांना कुठलाही विरोध केला नाही. सर्वेशने स्वत:चा गुन्हा कबुल केला. पोलिसांनी त्याला पोलिस ठाण्यात आणलं आणि अटक करत त्याच्यावर गुन्हा दाखल केला.

थोडक्यात बातम्या

…तर तुम्ही माणूस म्हणवण्याच्या लायकीचे नाहीत- असदुद्दीन ओवैसी

देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केला ‘हा’ गंभीर आरोप

खळबळजनक! नागपूरमधील लॉजवर अधिकाऱ्याचा संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

धक्कादायक!! औरंगाबादच्या कोविड सेंटरमध्ये महिलेसोबत घडला ‘हा’ प्रकार

6,6,6,6,6,6…! युवराजचा रेकाॅर्ड ‘या’ खेळाडूने मोडला, पाहा व्हिडिओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More