बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘लॉकडाऊन लागलं तर आम्ही पूर्णपणे कोलमडून पडू’; भरत जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना केली ‘ही’ विनंती

मुंबई | कोरोनामुळे देशातील सर्व क्षेत्राला मोठा फटका बसला होता. सिनेक्षेत्रातलाही मोठ्या प्रमाणात लाॅकडाऊनचा फटका बसला. जानेवारी उजाडला तरी राज्यातील सिनेमागृह आणि नाट्यगृह उघडली नव्हती. त्यानंतर अभिनेत्यांनी विविध माध्यमातून मागणी केल्यानंतर सरकारने 50% क्षमतेने सिनेमागृहे चालू केली होती. पण आता पुन्हा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुन्हा नाट्यगृह आणि सिनेमागृह बंद करण्यात येईल अशी चिंता कलाकारांना सतावत आहे. त्यामुळे मराठी सिनेअभिनेता भरत जाधव यांनी लाॅकडाऊन न करण्याची विनंती केली आहे. लॉकडाऊन लागलं तर आम्ही पूर्णपणे कोलमडून पडू, असं त्यांनी म्हटलं आहे.

गेल्या वर्षभरात नाटक सुरू करण्यासाठी आम्ही सर्वस्व दिलं. आज सर्व उपाययोजना करून नाटक सुरू आहे. नाट्यक्षेत्राला गती येत असताना असं संकट कोसळू नये. नाटक आज पुर्णपणे सावरलं नाही. अशात पुन्हा त्याचा घाव बसला तर त्याच्या होणाऱ्या भीषण परिणामांना तोंड द्यावं लागेलं. त्याचा थेट परिणाम आमच्या उपजिवीकेवर होतो. आता राज्य सरकारने नाट्यगृह बंद करण्याचा निर्णय घेऊ नये ही कळकळीची विनंती आहे, असं भरत जाधव म्हणाले.

कलाकारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लाॅकडाऊन करू नका अशी विनंती आधी देखील केली होती. परंतू कोरोना प्रसार वाढत असेल तर लाॅकडाऊन करावाच लागेल. जर हा निर्णय घ्यावाच लागलाच तर नाट्यक्षेत्राला यातून वगळावं अशी विनंती आम्ही सर्व कलाकार जाऊन मुख्यमंत्र्यांना करणार आहोत, अशी माहिती भरत जाधव यांनी दिली आहे.

दरम्यान, लाॅकडाऊनच्या काळात सर्वात जास्त फटका उद्योग क्षेत्राला बसला. तर सिनेक्षेत्रातील कलाकार वेबसिरीजकडे वळालेली दिसली. सिनेक्षेत्रावर इतर क्षेत्रातील लोकांचा उदरनिर्वाह देखील अवलंबून असतो. यावर सरकार काय निर्णय घेईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

‘राहुल गांधी फक्त मुलींच्याच कॉलेजला भेट देतात’; ‘या’ नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

अभिनेत्री आलिया भट्टला कोरोनाची लागण!

मुंबईतील लॉकडाऊनसंदर्भात किशोरी पेडणेकरांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या…

धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का, ‘या’ बड्या खेळाडूनं वर्तवलं अशुभ भाकीत!

14 वर्षांचं प्रेम मात्र फक्त एक नकार आणि झाला रक्तरंजीत शेवट!

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More