बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सामन्यात रोहित कर्णधार, ऐनवेळी विराट मैदानात उतरला अन् भर मैदानात झालं शीतयुद्ध

मुंबई | टी-20 विश्वचषक स्पर्धेचे सामने सुरू होण्याच्या अगोदर भारताचा इंग्लड आणि ऑस्ट्रेलिया संघासोबत सराव सामना झाला. बुधवारी ऑस्ट्रेलिया विरूद्ध सराव सामन्याचे नेतृत्व भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माकडे देण्यात आलं होतं. नाणेफेकीच्यावेळी रोहितने सांगितले की, या सामन्यात विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. मात्र सामना सुरू झाल्यानंतर कोहली मैदानात खेळण्यासाठी उतरला आणि रोहित आणि विराटमध्ये मैदानातच शीतयुद्ध पहायला मिळालं.

टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर विराट कोहली टी-20 क्रिकेट प्रकारामधून कर्णधारपदाचा राजीनामा देणार आहे. त्यामुळे भारतीय संघाचा नवीन कर्णधार कोण असणार या चर्चा होत असताना आजच्या सामन्यात नवीनच गोष्टी घडल्या. नाणेफेकीच्या वेळी रोहित शर्माने सांगितलं की विराट कोहली आजचा सामना खेळणार नाही. त्यानंतरही विराट कोहली मैदानात उतरला. हे बघून रोहित शर्मा आश्चर्यचकित झाला. त्यानंतर जे काही विराटने मैदानात केलं, हे बघून सगळेच चाहते विराटवर नाराज झाले आहेत.

रोहित शर्माकडे या सामन्याचे नेतृत्व असताना देखील विराट कोहली क्षेत्ररक्षण लावताना मैदानात दिसला. त्याचबरोबर गोलंदाजासोबत देखील रोहित शर्माने चर्चा करण्याच्या ऐवजी विराट कोहलीच चर्चा करत असल्याचं दिसून आलं. त्यावेळी रोहित फक्त नावाला कर्णधार आहे की काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला.

दरम्यान, विराट कोहली हा आक्रमक वृत्तीचा खेळाडू आहे. त्याची ही वृत्ती खेळताना वारंवार मैदानावर दिसून आली आहे. त्यामुळे विराटने केलेल्या आजच्या सामन्यातील हे कृत्य संघामध्ये तर उभी फुट पडली आहे का? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.

पाहा ट्विट-

थोडक्यात बातम्या-

तुमचा लॅपटॉप हॅंग होतोय का? मग वाचा ‘या’ भन्नाट टिप्स

सचिन सावंत यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट; राजकीय वर्तुळात खळबळ

अखेर रूपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड!

‘…तर केंद्र सरकार विकावं लागेल’; चंद्रकांत पाटलांनी सांगितलं इंधन दरवाढीचं कारण

“सत्तेत असला तरी चुकीचं वागू नका, सर्वांना नियम सारखेच आहेत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More