बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गोपीनाथ मुंडे साहेबांचा लाडका युवा नेता हरपला- पंकजा मुंडे

मुंबई |काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व खासदार राजीव सातव यांचं दुर्दैवी निधन झालं आहे. राजीव सातव यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. नुकतेच राजीव सातव यांच्या शरीरामध्ये एक वेगळ्या प्रकारचा व्हायरस सापडला असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. सातव यांच्या अकाली जाण्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. अशातच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीदेखील आपलं दु: ख व्यक्त केलं आहे.

काँग्रेसचे नेते, खासदार राजीव सातव यांच्या निधनाने मराठवाड्यातील एक अभ्यासू व उमदा नेता हरपला.. त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली!, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.

आज काँग्रेसने तर एक चांगला उमदा युवा नेता गमावलेलाच आहे. पण आज मुंडे साहेबांचा लाडका राजीव हा देखील गमावला आहे. मुंडे साहेबांना वाटायचं युवकांना आपण सहकार्य करायला पाहिजे, पक्षाच्या पलिकडे जाऊन चांगल काम करणाऱ्या, सामान्य समाजासाठी झटणाऱ्याच्या पाठीशी उभं राहीलं पाहिजे. राजीव सातव व आमचे जिव्हाळ्याचे संबंध असल्याचं पंकजा मुंडेंनी सांगितलं.

दरम्यान, सामान्य समाजासाठी धडपडणारा, एक तरूण उमदा, युवा नेता राजीव सातवच्या रूपाने आज आपण गमावलेला आहे. ज्यांनी आपलं आयुष्य कष्टामध्ये घालवून.. अनेक लोकांचे हात एका जीवनाला लागतात जेव्हा तो एका उंचीवर पोहचत असतो आणि तो त्या उंचीवरून अनेक जीवनांना स्पर्ष करत असतो. अशा प्रवासाचं एक उदाहरण असलेल्या राजीव सातवचा घास या क्रूर करोनाने घेतला, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

 

 

थोडक्यात बातम्या- 

“महाविकास आघाडी सरकारने सत्तेत येताच मराठा आरक्षणाचा खून केला”

“कोरोनाची लढाई कठीण आणि भयानक होणार आहे, सज्ज रहा”

‘डोळ्यांदेखत रुग्ण जीव सोडताहेत अन् आम्ही हतबलपणे पाहतोय’; डॉक्टर ढसाढसा रडले, पाहा व्हिडीओ

…अन्यथा तुमच्यावर कारवाई करणार; सलमान खानची कायदेशीर कारवाईची धमकी

गोड बोलून त्याला जवळ बोलावलं अन् नंतर महिलेनं त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला; धक्कादायक कारण आलं समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More