पुण्यातील छत्रपती शिवाजी मार्केटमधील आगीत लाखोंचं नुकसान; कोंबड्या, बकऱ्या होरपळल्या!
पुणे | पुणे कॅम्प परिसरातील छत्रपती शिवाजी मार्केटमध्ये आज पहाटे चारच्या सुमारास भीषण आग लागली होती. या आगीत मार्केटमधील 25 दुकानं जळून खाक झाली आहेत. ही आग शाॅर्टसर्किटमुळे लागली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळावर पोहचलं. त्यानंतर तासाभराच्या अथक प्रयत्नाने ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन पथकाला यश आलं. मात्र, तोपर्यंत आग मोठ्या प्रमाणात पसरली होती. त्यावेळी स्थानिकांची तारांबळ उडाली होती. शेवटी अग्निशमन पथकाला 8 गाड्यांच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्यात यश आले.
या मार्केटमध्ये भाजीपाला, फळ-भाज्यांची अनेक दुकानं आहेत, सोबतच मोठ्याप्रमाणात मासे आणि चिकन-मटणाची दुकानं आहेत. त्यामुळे या आगीत दुकानातील कोंबड्या, बकऱ्या आणि मच्छी देखील होरपळल्या आहेत. या आगीत लाखोंचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. छत्रपती शिवाजी मार्केट हे दोनशे वर्षापूर्वीपासूनचं ब्रिटिशकालीन मार्केट आहे.
दरम्यान, आगीसंदर्भात मार्केटमधील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मंजूर शेख यांनी सांगितले की, या भीषण आगीत मार्केटमधील 17 मासे विक्रेत्यांच्या आणि आठ चिकन विक्रेत्यांच्या दुकानांचं मोठं नुकसान झालं आहे. ही सगळी दुकानं आगीत जळून राख झाली आहेत. त्यामुळे अनेक दुकान मालकांचं लाखोचं नुकसान झालं आहे.
अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीप्रमाणे, पुणे शहरातील कॅम्प परिसरातील छत्रपती शिवाजी मार्केटमध्ये मासे, चिकन आणि अन्य वस्तूंची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असते. तेव्हा मार्केटमध्ये आज पहाटे पावणे चारच्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळाली, तेव्हा आम्ही ताबडतोब घटनास्थळी धाव घेतल्याचं त्यांनी सांगितलं.
थोडक्यात बातम्या –
‘तो येऊन जबाब देऊन गेला, पण महाविकास आघाडी सरकारने काय केलं?’; फडणवीसांचा सरकारवर घणाघात!
‘…पण एका मंत्र्याची विकेट पडणार’; ‘या’ भाजप नेत्याचं मोठं विधान!
बुमराहला शुभेच्छा देणं मयंक अग्रवालला पडलं महागात, वाचा नेमकं काय झालं…
पेस्टकंट्रोल करणं कुटुंबाला पडलं महागात; पालशेतकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर!
Comments are closed.