बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ‘या’ तारखेला अन्नत्याग आणि पदयात्रा

यवतमाळ | आपण शेतकरी आत्महत्येबद्दल अनेकदा ऐकतो, वाचतो पण त्याचं तेवढ्यापुरतं दु: ख व्यक्त करतो. मात्र त्यानंतर काय काहीच नाही. परिस्थिती जैसे थे. अशाच प्रकारे यवतमाळ जिल्ह्यात 19 मार्च 1986 ला साहेबराव करपे यांनी कुटुंबासह आत्महत्या केली होती. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर एक पत्र लिहिलं होतं. साहेबराव करपे आणि कुटुंबियांसह इतर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना श्रद्धांजली अपर्ण करण्यासाठी 19 मार्च रोजी डॉ. राजीव बसरगेकर, रामकिसन रुद्राक्ष, सुभाष कच्छवे आदींनी व्यक्त केला आहे.

नऊ दिवसांच्या या पदयात्रेत ते अनेक गावातून जाणार आहेत. दिग्रस कऱ्हाळे, हिंगोली, खानापूर, कळमनुरी, मालेगाव, बाभळी, शेंबाळ पिंपरी, मुळावा, पळशी, कृषी महाविद्यालय मरसुळ, उमरखेड, सुकळी, नांदगव्हाण, बिजोरा, मुडाना, महागाव, चिलगव्हाण या मार्गाने ही पदयात्रा जाणार आहे.

अमर हबीब आणि अनंत देशपांडे हे या वर्षी चिलगव्हाण येथे अन्नत्याग करणार आहेत.  गतवर्षी त्यांनी पुण्यात फुलेवाड्याला भेट देऊन बालगंधर्व समोर लहान लहान गटात बसून अन्नत्याग केला होता. त्याच प्रमाणे या वर्षी चिलगव्हाण येथे अन्नत्याग करणार आहेत. 2017 मध्ये त्यांनी चिलगव्हाणला भेट देऊन महागाव येथे उपोषण केलं होतं. चिलगव्हाण हे साहेबराव करपे यांचे गाव आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांकडे समाजाचे आणि सरकारचं लक्ष वेधण्यासाठी दरवर्षी 19 मार्च रोजी लाखो संवेदनशील नागरिक एक दिवस अन्नत्याग करतात. या वर्षीही हजाराहून अधिक शेतकाऱ्याना आपला प्राण गमवावा लागला. म्हणून या वर्षी नागरिकांनी अन्नत्याग करून आपल्या भावना व्यक्त कराव्या, असं आवाहन अमर हबीब यांनी केलं आहे. त्यासोबतच त्यांनी स्पष्ट केलं आहे की हा कार्यक्रम कोणत्या पक्षाचा नाही किंवा पक्षाचा नाही.

थोडक्यात बातम्या-

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावणं अशक्य- नवाब मलिक

मिथुन चक्रवर्ती अखेर ‘भाजप’च्या वाटेवर; कोलकाताच्या रॅलीत केला पक्षप्रवेश…

‘राज ठाकरेंच्या ‘त्या’ आवाहनामुळे कोरोनाचा संसर्ग वाढला’, पोलिसात तक्रार दाखल

‘पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे परदेशात जायला वेळ पण…’; शरद पवारांचं मोदींवर टीकास्त्र

मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा म्हणाले; ‘माता, माती आणि माणूसकी…’

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More