Top News

एका बायकोवरुन दोन जणांच्या गटात तुफान हाणामारी; सहा जणांना अटक

पुणे | पुण्यात एका वेगळ्याच कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी झालीये. एकाने घटस्फोट दिल्यानंतर दुसऱ्याने त्याच्या पत्नीशी लग्न केल्याच्या रागातून ही हाणामारी झाली आहे.

या दोन गटांमधील लोकांनी कोयते, काठ्या, दगडाने परस्परांवर वार केले. यामुळे दोन्ही गटांमधील 5 जणं जखमी झाले आहेत.

हैदर शफा इराणी यांनी फिर्याद दिली असून याप्रकरणी खडकी पोलिसांनी 6 जणांना बेड्या ठोकल्या आहेत तर एकूण 22 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे नातेवाईक असून अली अब्बास शौकत इराणी याने त्याच्या पत्नीला सोडून दिलंय. फिर्यादी याने तिच्यासोबत लग्न केल्याने आरोपीच्या मनात राग होता. यातूनत त्याने कोयता आणि काठीने मारहाण केली. दगडांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

थोडक्यात बातम्या-

भंडाऱ्यातील घटनेने पाकिस्तानी गोलंदाज शोएब अख्तरही हळहळला; म्हणाला…

आग विझवताना गॅस सिलेंडरचा स्फोट; अग्निशमन दलाचे 3 जवान जखमी

येत्या 10 दिवसांत राज्यातील सर्व महाविद्यालयं सुरु करण्याबाबत निर्णय घेणार

पुण्यात नवरदेवाच्या बापानं चक्क मेव्हणीचेच दागिचे चोरले, अन् लग्नात…

‘आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा’; प्रकाश आंबेकरांची मागणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या