बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून तिकीट काऊंटरवरील कर्मचाऱ्याला महिलेकडून बेदम मारहाण

मुंबई | मोबाईल चोरल्याचा आरोप करत एका महिलेने तिकीट काऊंटरवरील कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली आहे. यासर्व प्रकाराचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मारहाण करणाऱ्या महिलेचं नावं नंदिनी बेलेकर असून त्या मुंबई सेंट्रल ते खार रोड असा प्रवास करणार होत्या. मात्र त्या तिकीट काढण्यासाठी तिकीट काऊंटरवर गेल्या असता त्यांचा फोन काऊंटवरच विसरला.

फोनची चौकशी करण्यासाठी नंदिनी बेलेकर पुन्हा काऊंटरवर गेल्या तेव्हा तेथील कर्मचाऱ्यांनी मोबाईलबद्दल माहित नसल्याचं म्हटलं. पण त्या महिलेने काऊंटरच्या आत जाऊन ड्रॉवरची तपासणी केल्यावर त्यांना मोबाईल आढळला.

दरम्यान, खोटं बोलून मोबाईल चोरण्याचा प्रयत्न केल्याने त्या महिलेेने रेल्वे कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली असल्याचं समोर आलं आहे.

महत्वाच्या बातम्या

-युतीची सत्ता आली तर पुढचा मुख्यमंत्री कुणाचा?? गिरीश महाजन म्हणतात…

-“मी उद्विग्न होऊन बोलून गेलो की आरक्षण गेलं खड्ड्यात पण…”

-मेहूल चोक्सीला भारतात आणण्यासाठी एअर अ‌ॅम्बुलन्स देण्याची ईडीने दाखवली तयारी

-…तर याद राखा तुमची गाठ शिवसेनेशी आहे; उद्धव ठाकरेंचा इशारा

-अभिजीत बिचुकलेच्या जामिनावर कोर्टाचा मोठा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More