मुंबई | मुंबईत एका ट्रॅफिक हवालदाराला बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाहतुकीचे नियम मोडल्याने कारवाई केलेल्या हवालदाराला एका महिलेने बेदम चोप दिला आहे.
या व्हिडीओत महिला आणि तिच्या साथीदाराकडून वारंवार शिवीगाळ का केली? असा जाब विचारला आहे. त्यानंतर त्या महिलेने या व्हिडीओत हवालदाराची कॉलर पकडत मारहाण केली.
महिलेने त्या हवालदाराचे कपडेही फाडले. या व्हिडीओत ती महिला त्या हवालदाराला शिवीगाळ करताना दिसत आहे. याप्रकरणी L. T. मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आला आहे.
सादविका रमाकांत तिवारी आणि मोहसीन निजामउददीन खान यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Assault on Mumbai police traffic police constable discharging his duty. Kalbadevi, Mumbai. pic.twitter.com/USe96NvG9Q
— Mustafa Shaikh (@mustafashk) October 24, 2020
महत्वाच्या बातम्या-
देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण!
“….म्हणून पंकजा मुंडे भाजप सोडणार नाहीत”
“प्रविण दरेकर आणि राधाकृष्ण विखे यांना काय चॉकलेट देवून आणलं का?”
मुंबईकरांनो मास्क घातला नसेल तर आता रस्ता झाडावा लागेल!