बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबईत कोरोना सेंटरमध्ये घुसला भलामोठा अजगर, पाहा धक्कादायक व्हिडीओ

मुंबई | कोरोना विषाणूनं जगभरात थैमान घातलं असून सगळीकडे सध्या चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. अशातच कोरोना सेंटरमध्ये अनेक चित्रविचित्र प्रकार घडत असतात. कधी कोरोना सेंटरमध्ये उंदीर निघतात तर कधी सेंटरला आग लागते. यातच आणखी एक अशीच धक्कादायक घटना कोरोना सेंटरमध्ये घडल्याचं समोर आलं आहे.

मुंबईतील दहिसर जम्बो कोरोना सेंटरमध्ये चक्क भलामोठा अजगर सापडला. अचानकपणे घुसलेल्या अजगरामुळे सगळ्या सेंटरमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यानंतर कोरोना सेंटरमधील कर्मचाऱ्यांनी अजगराला पकडण्यासाठी सर्पमित्रांना बोलावून घेतलं. सर्पमित्रांनी खूप मेहनतीनं अजगराला पकडत बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आलं आहे, असं सर्पमित्र सूरज यादवनं सांगितलं.

सध्या कोरोना आटोक्यात येत असल्यानं जम्बो कोरोना सेंटरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे आता या कोरोना सेंटरमध्ये लसीकरण चालू केलंय, त्यामुळे सध्या या दहिसर जम्बो कोरोना सेंटरमध्ये नागरिकांना लस देण्यात येत आहे.

दरम्यान, दहिसर जम्बो कोरोना सेंटरमध्ये जास्त लोक नसल्यानं आणि सर्पमित्रही संपर्क करताच लवकर घटनास्थळी दाखल झाल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे. त्यामुळे तिकडे उपस्थित असलेल्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या –

“सैन्य वापसीचा निर्णय योग्यच, मी नसतो तर कुणीच हे धाडस केलं नसतं”

“…तोपर्यंत डोक्यावर फेटा आणि गळ्यात हार घालणार नाही”

सकाळपासून गायब होती 19 वर्षीय तरुणी, शोध घेतल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड

भोजपुरी अभिनेत्री त्रिशाकर मधुचा खासगी व्हिडीओ व्हायरल, सिनेसृष्टीत खळबळ

शिवसेना दत्तात्रेय भरणेंवर नाराज?, ‘या’ नेत्यानं मागितला राजीनामा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More