बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोणता झेंडा घेऊ हाती?, एक-दोन नव्हे तर ‘या’ नेत्याने केलं पाचव्यांदा पक्षांतर

ठाणे | भारतीय राजकारणाच्या इतिहासात आयाराम गयारामची (Aayaram Gayaram) गोष्ट प्रचंड गाजली होती. 1967चा तो काळ होता. गया लाल हे हरियाणाच्या पलवल जिल्ह्यातील हसनपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी एकाच दिवसात तीनवेळा पक्ष बदलला होता. अशातच आता महाराष्ट्रातील एका नेत्याने पाचव्यांदा पक्षांतर करत राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश केला आहे. (Suresh Balya Mama Mhatre)

सुरेश गोपीनाथ म्हात्रे म्हणजेच बाळ्या मामा हे ठाण्यातील दिग्गज नेते आहेत. शिवसेनेतून (Shiv Sena) आपल्या राजकीय कारकिर्तीची सुरूवात केल्यानंतर त्यांनी ठाणे ग्रामीण जिल्हा संपर्क प्रमुख म्हणूनही काम केलं. त्यानंतर त्यांनी मनसे मध्ये प्रवेश केला आणि 2014 साली मनसेकडून (MNS) निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांचा दारूण पराभव झाला.

त्यानंतर सुरेश म्हात्रे यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आणि काहीच दिवसांमध्ये पुन्हा शिवबंधन बांधून घेतलं. शिवसेनेत पुन्हा आल्यावर त्यांनी 2019 मध्ये मित्रपक्ष भाजपचे उमेदवार कपील पाटील (Kapil Patil) यांच्याविरूद्ध दंड थोपटले. त्यामुळे शिवसेनेने त्यांची हकालपट्टी केली. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

दरम्यान, सुरेश म्हात्रे यांनी आता काँग्रेसला (Congress) देखील रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थित सुरेश म्हात्रे यांनी मनगटी घड्याळ बांधलं आहे. त्यामुळे आता सुरेश म्हात्रे यांची आता राजकीय वर्तुळात तुफान चर्चा होताना दिसतीये.

थोडक्यात बातम्या-

ॲमिटी विद्यापीठाचं मोठ पाऊल, अमेरिकेतल्या तीन विद्यापीठासोबत करार

‘माझ्यासोबत त्याला शारिरीक संबंध ठेवायचे होते…’; प्रसिद्ध मालिकेतील अभिनेत्रीच्या आरोपाने खळबळ

मोदी सरकारची भन्नाट योजना; मुलगी 18 वर्षाची होताच मिळतील 65 लाख!

जंगलाच्या राजावर झेब्रा पडला भारी; व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल

वोडाफोन-आयडियाची धूर्त खेळी, लक्षात येताच जिओनं केला मोठा भांडाफोड

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More