नागपूर महाराष्ट्र

काॅंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी मोदींसोबत पंगा घेणाऱ्या नेत्याची नियुक्ती होणार???

नागपूर | काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला असून कोणत्याही क्षणी ते राजीनामा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे.

प्रदेशाध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या अनेक नेत्यांची नावं चर्चेत आहेत, यात विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाची इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली आहे.

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी सध्या सहा नेत्यांची नावे चर्चेत असून महाराष्ट्र काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून पक्षश्रेष्ठी कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले आहे.

काँग्रेस नेते सुनील केदार, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर या राज्यातील नेत्यांची नावे प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. त्याशिवाय नाना पटोले, राजीव सातव आणि पृथ्वीराज चव्हाण या राष्ट्रीय स्तरावरील राज्यातील नेत्यांची नावेही प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत असल्याने काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे

थोडक्यात बातम्या-

“अबू आझमी समजूतदार नेते, संभाजीनगरबाबत त्यांच्याशी चर्चा करु”

काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात राजीनामा देणार?

‘…तर महाराष्ट्राचंही नामांतर करा’; या नेत्याची राज्य सरकारकडे मागणी

‘ही तर टाटा, बिर्लांची सेना’; आशिष शेलारांचा शिवसेनेवर हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सौरव गांगुलीला फोन, म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या