अंगणात दबा धरून बसला बिबट्या, अचानक महिला समोर आली अन्…; पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

मुंबई | जंगलांच्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या ऱ्हासामुळे जंगली प्राणी मानवी वस्त्यांकडे वळण्याचं प्रमाण खूप जास्त वाढलं आहे. गेल्या काही दिवसांत जंगली प्राण्यांनी लोकांवर हल्ले केल्याच्या कित्येक घटना समोर आल्या आहेत. सध्या अशीच एक घटना मुंबईतील आरे कॉलनीत घडली आहे.

मुंबईतील आरे कॉलनीत एका बिबट्याने वयस्कर आजींवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. सध्या हा सीसीटीव्ही व्हिडीओ सोशल मीडियावर खूप वेगानं व्हायरल होत आहे. सुदैवाने या आजी बिबट्याच्या तावडीतून सुखरूप बचावल्या आहेत.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक आजी काठीचा आधार घेत घराच्या अंगणामध्ये आल्या आहेत. थोड्यावेळाने त्या अंगणातील पायरीवर बसतात. आपल्या पाठीमागे बिबट्या बसला असेल याची भनक देखील त्यांना नसते. या वृद्ध आजींना काही समजण्यापूर्वीच बिबट्या त्यांच्यावर हल्ला करतो

आजी काठीने बिबट्याचा हल्ला रोखण्याचा प्रयत्न करतात. यावेळी त्या जमिनीवर कोसळतात. परंतु तरी देखील आजी काठीने बिबट्याला हुसकवण्याचा प्रयत्न करतात. वृद्ध आजींनी केलेला प्रतिकार पाहून काही वेळाने बिबट्या तिथून पळ काढतो.

पाहा व्हिडीओ-

 

थोडक्यात बातम्या –

लांच्छनास्पद! महात्मा फुलेंचं नाव असलेल्या विद्यालयात फीसाठी विद्यार्थ्याला मारहाण

“येत्या 15 दिवसात खड्डे भरा अन्यथा, तुम्हालाच खड्ड्यात भरावं लागेल”

IT कर्मचाऱ्यांची दिवाळी! आठवड्यातून 3 दिवस सुट्टी अन् 4 दिवस काम

अभिनेत्री श्वेता तिवारीची प्रकृती बिघडली; ‘या’ कारणामुळे केलं रुग्णालयात दाखल

“आता तरी केंद्र सरकार याचा विचार करणार आहे का?”

Leopard VideoMarathi NewsMumbai Viral Videoviral videoबिबट्या व्हिडीओमराठी बातम्यामुंबई व्हायरल व्हिडीओव्हायरल व्हिडीओ