बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बापासाठी 35 लाख रुपयांचं लोन काढलं पण कोरोनाने घेतला बापाचा जीव, अन् आता….

नवी दिल्ली | सध्या कोरोनाने देशात प्रचंड थैमान घातलं आहे. कोरोना महामारीमुळे लोक आपले जवळची नाती तर गमवत आहेतच मात्र त्यासोबतच कोरोनाच्या उपचारासाठी होणाऱ्या खर्चाने लोक हैराण देखील होत आहेत. अशीच एक घटना गांधीनगर येथे घडली आहे. येथील एका तरुणाने त्याच्या वडिलांसाठी 35 लाख रुपयांचं लोन घेतलं. त्यानंतर जे झालं ते ऐकून कोणाच्याही आंगावर काटा येईल.

गुजरातच्या गांधीनगर येथील रहिवासी असणाऱ्या राजन यांच्या वडिलांनी कोरोनाची लागण झाली होती. यानंतर त्यांच्या गांधीनगरमधील वेगवेगळ्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आला. यादरम्यान आपल्या वडिलांवर चांगले उपचार करता यावे यासाठी राजनने 35 रुपयांचं लोन घेतलं. मात्र अखेर कोरोनाने राजनच्या वडिलांचा जीव घेतला.

वडिलांच्या मृत्यूनंतर रुग्णालयाने दिलेलं बिल पाहून राजन यांना धक्का बसला. राजन यांचे वडील 10 दिवस व्हेंटिलेटरवर होते. त्यामुळे व्हेंटिलेटरसाठी दररोज 50 हजार रुपयांचा चार्ज लावला. औषधं आणि इंजेक्शनसाठी दररोज 75 हजार रुपयांचा वसुली करण्यात आली. असं पाहता रुग्णालयाचं एकूण बिल 18 लाखांपर्यंत पोहोचलं. इंजेक्शन आणि औषधांसाठी 15 लाख रुपये खर्च आला.

दरम्यान, लोनमुळे राजन यांचं सर्व वेतन केवळ ईएमआय फेडण्यातच जात असल्याचं राजन यांनी सांगितलं आहे. तसेच ज्याच्यासाठी एवढं लोन घेतलं तो माणूस तर गेलाच मात्र काढलेलं लोन देखील नीट जगून देईना, असं राजनने म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

‘कोरोनाची तिसरी लाट आली तरी…’; उद्धव ठाकरेंचा उद्योजकांना सल्ला

‘महागाईच्या भडक्यात बेरोजगारीची लाट, लोकांना काम देण्याची गरज’; तज्ज्ञांचा गंभीर इशारा

“बाळासाहेबांनी काँग्रेसला गाडून टाका सांगितलं होतं, खुर्चीसाठी तुम्ही त्यांचे विचारच गाडून टाकले ”

‘दररोज सामन्यापुर्वी…’; सिक्सर किंग युवराजने दिला भारतीय संघाला मोलाचा सल्ला

‘बिल्डरने वेळेवर घर दिलं नाही तर…’; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More