बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अमेरिकेची ‘ही’ महत्त्वाची माहिती तालिबान्यांच्या हाती, तालिबान देणार अमेरिकेला धक्का???

नवी दिल्ली | तब्बल 20 वर्षानंतर तलिबानने अफगाणिस्तानात पुन्हा वर्चस्व मिळवलं आहे. अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तानमधून काढता पाय घेतल्यानंतर तालिबानने केवळ 100 दिवसात अफगाणिस्तानवर ताबा मिळवला आहे. तालिबानने काबुल, कंधार ही महत्त्वाची शहरं जरी तालिबानच्या ताब्यात असली तरी आणखी काही भागात अमेरिकन सैन्य तळ ठोकून बसलं आहे. त्यातच आता एक मोठी माहिती समोर येत आहे.

तालिबानने संसद आणि राष्ट्रपती भवन ताब्यात घेतल्यानंतर अफगाणिस्तानच्या काही महत्त्वाच्या ठिकाणावर तालिबानने कब्जा केला आहे. तालिबानने गुप्तपणे अमेरिकन सैन्यातील बायोमेट्रिक यंत्रणा ताब्यात घेतली आहे. या यंत्रणेमध्ये अमेरिकन सैन्याची माहिती आणि काही अफगाणी लोकांची माहिती असल्याचं समोर येत आहे. त्यामुळे तालिबानच्या हाती मोठा खजिना लागवल्याची चर्चा सुरू आहेत.

या यंत्रांमध्ये अमेरिका सैन्य आणि अफगाणी नागरिकांच्या फिंगर प्रिंट, डोळ्यांचे स्कॅनिंग आणि महत्त्वाची बायोलाॅजिकल माहिती आहे. याचा वापर डेटाबेससाठी वापरला जाऊ शकतो. हँडहेल्ड इंट्रोएजेंन्सी आयडेंन्टीटी डिटेक्शन इक्विप्मेंट असं या यंत्राचं नाव आहे. यात अमेरिकन राजदूतांची माहिती असल्याचं समोर आली आहे. यात पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयचा देखील हात असल्याचा संशय अमेरिकेला आहे.

दरम्यान, अमेरिकेच्या बँकांमध्ये अफगाण सरकारची 10 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. मात्र आता ही संपत्ती अमेरिकेने सील केली आहे. त्यामुळे अमेरिकेने तालिबान्यांना मोठा आर्थिक झटका दिला आहे. द अफगाणिस्तान बँक या देशाच्या शिखर बँकेची मोठ्या प्रमाणात संपत्ती परदेशामध्ये ठेवली आहे. त्यामुळे ही संपत्ती मिळवणं तालिबान्यांसाठी आता अशक्य झालंय.

थोडक्यात बातम्या-

‘नितीन गडकरीचं म्हणणं भाजप आणि संघाने ऐकलं तर…’; अशोक चव्हाणांचा भाजपला सल्ला

एसटीचे तिकीट मशीन्स बंद, पुन्हा टिक टिक सुरु, पाहा व्हिडीओ

लहान मुलांच्या लसीकरणात पडणार आणखी एका लसीची भर; ‘या’ वयोगटाला मिळणार डोस

…तर मी त्याच दिवशी भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देणार होतो- छत्रपती संभाजीराजे भोसले

शरद पवारांनतर अजित पवाराचंही राज ठाकरेंना रोखठोक प्रत्युत्तर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More