बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यात फार्महाऊसवर नाचगाणं, पैशांचा पाऊस अन् पोरी, पोलिसांची रेड पडताच गदारोळ

पुणे | कोरोनाने सर्व राज्यभर थैमान घातलं आहे. राज्यातील प्रमुख शहारांमधील एक असलेल्या पुण्यातही मोठ्या प्रमाणात रूग्णसंख्या वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने लॉकडाऊनच्या सूचना दिल्या आहेत. मात्र तरीही काही बेजबाबदार नागिरक नियमांचं उल्लंघन करताना दिसतात. अशाच प्रकारे पुण्यातील एकाने चक्क लॉकडाऊनमध्ये पार्टीचं आयोजन केल्याचं समोर आलं आहे.

समीर ऊर्फ नितेश पायगुडे  याने लॉकडाऊनच्या काळात पैसेे कमवण्यासाठी स्वत:च्या फार्महाऊसवर डान्स बार आणि देहविक्रीचा व्यवसाय सुरु केला. पुण्याजवळ असलेल्या लबडे फार्महाऊसवर सहा मुलींना बोलवण्यात आलं. त्यानंतर काही लोकांनाही तिथं बोलवण्यात आलं होतं. फार्महाऊसमध्ये विदेशी दारूसोबत नाच-गाण्याची सोय केली होती.

पार्टी सुरू झाल्यावर डीजेवर गाणी लावण्यात आली. पार्टीसाठी आलेल्या तरूणांनीही गाण्यावर ताल धरला आणि त्यानंतर देहविक्री करणाऱ्या मुलीवर पैशाचा पाऊस पडू लागला होता. त्यासोबतच फार्महाऊसमध्ये देहविक्रीचा धंदा सुरू होता. फार्महाऊवर सुरू असलेल्या या पार्टीचा आवाज आजूबाजूच्या लोकांना गेला. एका शेजारच्या व्यक्तिने पोलिसांना कळवलं. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यावर फार्महाऊसमधील नाचगाणं थांबलं आणि धावपळ सुरू झाली.

दरम्यान,  पोलिसांनी सगळ्यांना ताब्यात घेतलं याप्रकरणाची सध्या चौकशी सुरु आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.

थोडक्यात बातम्या- 

एवढा बेजबाबदार पंतप्रधान जगात आतापर्यंत कुठेच झाला नाही- नाना पटोले

“…तर भर चौकात गिरीश महाजनांचा सत्कार करेल”; गुलाबराव पाटलांचं महाजनांना आव्हान

विनाकारण घराबाहेर फिरत होत्या मुली, पोलिसांनी अशी घडवली अद्दल, पाहा व्हिडीओ-

न्यूज इंडस्ट्रीला मोठा धक्का! रोहित सरदाना यांच्यानंतर लोकप्रिय महिला ॲंकरचं निधन

बिहारचा बाहुबली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोहम्मद शहाबुद्दीनचं कोरोनाने निधन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More