बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उधारीचे पैसे मागणं पडलं महागात; विधवा महिलेसोबत घडली अत्यंत धक्कादायक घटना

हैद्राबाद | उधारी परत मागणं एका विधवा महिलेच्या जीवावर बेतलं आहे. दिलेली उधारी परत मागायला गेलेल्या महिलेला आरोपीने थेट जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना तेलंगणामधील मेडक जिल्ह्यातील एका गावात घडली आहे.

गावकऱ्यांनी संबंधित महिलेला रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचारादरम्यान संबंधित विधवा महिलेनं आपले प्राण सोडले आहेत. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.

42 वर्षीय मृत महिलेचं नाव सकरी बाई आहे. ती सोमवारी उधारीचे पैसे परत घेण्यासाठी एका व्यक्तीकडे गेली होती. त्यावेळी आरोपीने पैसे परत न करता, तिच्यासोबत हे दुर्दैवी कृत्य केलं आहे.

आरोपीने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळलं आहे. यानंतर तिला हैदराबादमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण तिचा जीव वाचू शकला नाही. तिचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पेशाने कसाई असणाऱ्या पी सदत याला अटक केली आहे. उधारीच्या पैशावरून संबंधित महिलेचा आणि सदतसोबत वाद झाला होता.

थोडक्यात बातम्या-

गेल्या 10 दिवसांपासून जळतंय ओडिसाचं जंगल; हजारो प्राण्यांच्या जिवाला धोका

…अन् भर पत्रकार परिषदेत खासदारानं महिला आमदाराच्या गालाला लावला हात, पाहा व्हिडिओ

पुणे विद्यापीठाच्या परीक्षेचा पेच अखेर सुटला; ‘या’ तारखेपासुन परीक्षेला सुरूवात

लालूंच्या सुरक्षा रक्षकांनी पळवल्या गाद्या आणि उशा; रुग्णालयाची पोलिसांत धाव

पुण्यात मनसेने केक कापून साजरा केला कोरोनाचा वाढदिवस!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More