पाचव्या मजल्यावरून चिमुकली थेट खाली, देवासारखा आला तरूण; चित्तथरारक घटना कॅमेऱ्यात कैद
नवी दिल्ली | चीनच्या झेजियांग (Ziyang City) शहरात पाचव्या मजल्यावरुन एक दोन वर्षांची चिमुरडी पडली. अचानक एका तरुणाने धाव घेत तिला झेलले आणि त्या बाळाचे प्राण वाचले. हा सर्व घटनाक्रम कॅमेऱ्यात कैद झाला. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. आता हा विडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतो आहे.
चिनच्या झेजियांग प्रांतात हा चित्तथरारक प्रकार घडला. या चिमुकलीचे प्राण वाचल्याने तिच्या मातापितांना आनंद झाला. त्यांनी त्या तरुणाचे आभार मानले. तर या वेळेवर धाऊन आलेल्या सुपरहिरोचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
या सुपर हिरोचे नाव शेन डोंग (Sheng Dong) आहे. तो त्याच शहराचा रहिवाशी आहे. शेन त्याच इमारतीखाली आपली गाडी पार्क करत होता. त्यावेळी त्याला ही कन्या पाचव्या मजल्याच्या खिडकीतून पडताना दिसली. त्याने लागलीच धाव घेत, चिमुकलीचे प्राण वाचविले.
शेन आणि त्याच्यासोबत असलेली महिला दोघेही रसत्याच्या कडेला आपली गाडी पार्क करुन उभे होते. त्यावेळी त्यांना ही मुलगी दिसली. त्यांनी तात्काळ तिला झेलत तिचे प्राण वाचविले. कन्येला कोणतीही दुखापत झाली नाही. ती आता ठणठणीत आहे.
Thankfully, he caught her just in time. pic.twitter.com/ALkMlCaDrB
— South China Morning Post (@SCMPNews) July 22, 2022
थो़डक्यात बातम्या –
‘संजय राऊतांनी हलकटासारखं सांगितलं इथून जा, तेव्हाच ठरवलं…’, गुलाबराव पाटलांचं मोठं वक्तव्य
‘त्या’ फोटोंमुळे सुष्मिता सेन सोशल मीडियावर ट्रोल!
“शिवचरित्राबाबात अर्धवट माहिती देणाऱ्यांमध्ये बाबासाहेब पुरंदरेंचा समावेश”
नितेश राणेंबद्दल विचारलेल्या प्रश्नावर शरद पवारांनी एका वाक्यातच विषय संपवला, म्हणाले…
मोठी बातमी! ‘भाभीजी घर पर है’ फेम अभिनेत्याचा क्रिकेट खेळताना मृत्यू
Comments are closed.