बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मास्क नाकावरुन घसरलं म्हणून पोलिसांनी भररस्त्यात तुडवलं, पाहा धक्कादायक व्हिडीओ

भोपाळ | महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे देशभरात राज्यांच्या सोईनुसार निर्बंध लावण्यात आले आहेत. मध्यप्रदेशातही कोरोनाचा फैलाव वाढल्यानं अनेक ठिकाणी नियमांचं पालन करून घेतलं जातं आहे. यातच एका व्यक्तीने मास्क योग्य प्रकारे न घातल्याने मध्यप्रदेशच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी मिळून एका व्यक्तीला भर रस्त्यात बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

मध्यप्रदेश मध्ये राहणारा कृष्णा नावाचा व्यक्ती रिक्षा ड्रायव्हर म्हणून काम करतो. आपल्या आजारी असलेल्या वडिलांना भेटण्यासाठी कृष्णा रुग्णालयात जात होता. तर दुसरीकडे इंदौरमध्ये मंगळवारी कोरोना रोखण्यासाठी तपासणी मोहीम सुरू करण्यात आली होती. याच दरम्यान कृष्णा त्या तपासणीच्या ठिकाणाहून जात होता.

कृष्णाचा मास्क नाकावरून खाली आलेला दिसल्यानंतर दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला थांबवलं. पोलिसांनी त्याला तात्काळ पोलीस ठाण्यात येण्यास सांगितलं. वडिलांना भेटायला जात असल्याने त्याने पोलिसांना त्यांच्यासोबत येण्यास नकार दिला. त्यानंतर या दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यांनतर पोलीस कर्मचाऱ्यांनी कृष्णाला बेदम मारहाण केली. त्या ठिकाणाहून जात असलेल्या एका व्यक्तीने हा प्रसंग शुट केला.

दरम्यान, व्हिडीओमध्ये पोलीस कृष्णाला मारहाण करताना दिसत आहे. तर कृष्णाने पोलिसांची काॅलर पकडून शिवीगाळ केल्याचा दावा पोलीस कर्मचाऱ्यांनी केला आहे.

पाहा व्हिडीओ-

 

थोडक्यात बातम्या-

“…म्हणून मुंबई इंडियन्सने पुन्हा यावर्षीही आयपीएल जिंकावी”

सचिन तेंडुलकर आणि पृथ्वी शॉ यांच्यामध्ये आहे ‘हे’ मोठं साम्य; ऑस्टेलियाच्या ‘या’ माजी खेळाडूचा मोठा दावा

शरद पवारांनी घरीच घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस; केलं ‘हे’ महत्वाचं आवाहन

शिवभोजन थाळीसंदर्भात छगन भुजबळ यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

राजेश टोपे यांनी केंद्र सरकारकडे केल्या ‘या’ महत्वाच्या मागण्या!

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More