मुंबई | भाजपमध्ये काम केलेला माणूस इतर पक्षात रमतच नाही, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. माजी आमदार बाळासाहेब सानप हे पुन्हा भाजपमध्ये गेले आहेत. त्यावेळी पाटील बोलत होते.
विरोधकांकडून होणाऱ्या ट्रोलिंगला आपण घाबरत नसल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. पाटलांना सोशल माध्यमांवर ‘चंपा’ नावाने चिडवलं जातं. मात्र पाटलांनी आपण ट्रोलिंगला घाबरत नसल्याचं सांगितलं.
भाजपमधून राष्ट्रवादीत, त्यानंतर शिवसेनेत आणि आता परत एकदा भाजपमध्ये माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी फडणवीस म्हणाले की, ‘येत्या काळात भाजप पक्षात अनेकांचा प्रवेश होणार आहेत.’
दरम्यान, विधीमंडळाच्या अधिवेशनात येत्या चार महिन्यात तुमचे आमदार राजीनामे देऊन आमच्याकडे येतील हे तुम्हाला कळणार नसल्याचा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला होता.
आज माजी आमदार श्री. बाळासाहेब सानप जी यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. देशाचा आणि राज्याचा विकास केवळ भाजपा करू शकतो, असा विश्वास बाळगून बाळासाहेब जी यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह आज पक्ष प्रवेश केला आहे. pic.twitter.com/qzGycsrUsF
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) December 21, 2020
थोडक्यात बातम्या-
ममता बॅनर्जींचा भाजपवर सर्जिकल स्ट्राईक; भाजप खासदाराच्या पत्नीचा तृणमूलमध्ये प्रवेश
“महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढवावी अशी माझी इच्छा”
शरद पवार जर पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार असतील तर…; फडणवीसांचं मोठं वक्तव्य!
“ब्रिगेडी हिंदुत्ववाद्यांनी राममंदिर वर्गणीला टार्गेट करणं स्वाभाविकच”
‘…तर पहिला कडेलोट संजय राऊतांचा केला असता’; निलेश राणेंची जहरी टीका