बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शरद पवार-अनिल परब बैठकीत नेमकं काय झालं; आली ‘ही’ माहिती समोर

मुंबई | गेल्या दोन आठवड्यापासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. एसटी महामंडळाचं विलीगीकरण राज्य शासनात करण्यात यावं यासाठी एसटी कर्मचारी (ST Workers) राज्यभर आंदोलन करत आहेत. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यात आज बैठक झाली.

अनिल परब आणि शरद पवार यांच्यात आज चार तास बैठक झाली. या बैठकीत परिवहन महामंडळाचे अधिकारी देखील उपस्थित होते. चार तास झालेल्या या बैठकीत काहीही ठोस निर्णय झाला नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर अनिल परब यांनी माध्यमांशी संवाद साधला.

आज शरद पवार यांनी मला बोलावलं होतं. त्यांना सध्याची सर्व परिस्थिती समजून घेतली. यावर काय काय मार्ग निघू शकतात यावर देखील चर्चा झाली. एसटी कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती, एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती यावर देखील चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, आजच्या बैठकीत वेतनवाढीवर चर्चा झाली आहे आणि येत्या अधिवेशनात यावर चर्चा केली जाईल, असंही परब यांनी सांगितलं आहे. तर संप मिटवण्याच्या दृष्टीने देखील चर्चा केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“भरतासारख्या भावावर फक्त रामच प्रेम करू शकतात, आपण ते करू शकत नाही”

पार्थ पवार पुन्हा मावळातून निवडणूक लढवणार का?; ट्विटमुळे चर्चांना उधाण

अखेर काँग्रेसच्या प्रयत्नांना यश, भाजपने निवडणुकीत दिला काँग्रेसला हात

वानखेडे-मलिक वादात आता नवाब मलिकांच्या दोन्ही मुलींची उडी

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यातील ‘या’ भागात विजांच्या कडकडाटासह होणार पाऊस

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More