बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक!; चार मित्रांकडून मुलीवर बलात्कार, व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर टाकला

पाटणा | भारतात दिवसेंदिवस मुलींवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. असाच काहिसा धक्कादायक प्रकार बिहारमधील सीतामढी परिसरात घडला आहे. एका अल्पवयीन मुलीच्या अपहरणाची आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सीतामढी पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

गेल्या आठवड्यामध्ये सीतामढी परीसरातील एका अल्पवयीन मुलीचं चार जणांनी अपहरण केल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर या चार जणांनी पिडीत मुलीवर सामुहिक बलात्कार केला. इतकचं करून ते थांबले नाहीत, या सर्व प्रकाराचा त्यांनी व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यामुळे पीडित परिवाराची प्रचंड बदनामी झाली आहे.

याप्रकारानंतर गावातील लोकांनी संतप्त होऊन या आरोपींविरोधात पंचायत भरवली होती. मात्र, पंचायतीत दिलेल्या निकालांचे पालन आरोपींनी केलं नाही. त्यामुळे पीडित मुलीच्या परीवाराने स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणात पोलिसांनी चार तरुणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

दरम्यान, सीतामढीचे एसपी अनिल कुमार यांनी पीडितेला न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं आहे. या प्रकरणाची सुनावणी पॉक्सो कायद्यांतर्गत होईल. तसेच सोशल मीडियावर या अमानुष कृत्याचा व्हिडिओ प्रसारित करणार्‍यांवर कडक कारवाई करणार असल्याची माहितीही एसपींनी दिली आहे.

मात्र, पोलीसात तक्रार दाखल केल्यानंतर पिडीत तरुणीच्या कुटुंबियांनी सतत धमकावलं जात आहे. तसेच जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या जात आहेत. त्यामुळे पीडित कुटुंब सध्या दहशतीत जगत आहे.

थोडक्यात बातम्या-

‘संधी दवडू नका’; सोन्याच्या दरात तब्बल ‘इतक्या’ हजारांची मोठी घसरण!…

माझा काहीही संबंध नाही, अखेर पूजा चव्हाण प्रकरणात ‘त्या’ व्यक्तीनं मौन सोडलं!

बुधवारनंतर गुरुवारी पुण्यात कोरोना रुग्णसंख्येत धक्कादायक वाढ, जाणून घ्या आकडेवारी

‘त्या’ प्रकरणावरुन अजित पवारांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनाच फटकारलं!

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत घडला धक्कादायक प्रकार, सिनेमात सेक्स वर्कर म्हणून दाखवलं!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More