बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संगमनेरमध्ये जमावाचा पोलिसांच्या गस्त पथकावर हल्ला ; पाहा व्हिडीओ

अहमदनगर | कोरोनाच्या महामारीमुळे महाराष्ट्रात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. त्यामुळे आता अत्यावश्यक सेवा वगळता कोणालाही  विनाकारण बाहेर फिरता येत नाही. पोलीस देखील सार्वजनिक ठिकाणी गर्दी कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण यात आता संगमनेरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. संगमनेरमध्ये पोलिसांच्या गस्त पथकावरच आता हल्ला करण्यात आला आहे.

संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास संगमनेरमध्ये संचारबंदी काळात पोलीस पथक गस्त घालत होतं. मात्र, दिल्ली नाका परिसरात गर्दी जमा झाल्याचं पोलिसांना दिसलं. पोलिसांनी त्यांना गर्दी का असं विचारल्यावर जमावाने पोलिसांवरच हल्ला केला आहे. त्यानंतर पोलिसांनी 6 जणांसह अज्ञात जमावाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर दुसरीकडे पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप जमावाने केला आहे.

हल्ला करणाऱ्या जमावाने पोलिसांना धक्काबुक्की करत मारहाण केली आहे. तर हल्लेखोरांनी त्यानंतर पोलीस चौकीमध्ये पोलिसांच्या गाड्यांचीही तोडफोड केली. या घटनेती माहिती होताच उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्यासह संगमनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक मुकुंदराव देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली. आता जमावाला नियंत्रित केलं गेलं आहे.

दरम्यान, झालेल्या प्रकारात पोलिसांनी आता सक्ती दाखवत, पथक गस्त घालणाऱ्या पोलिसांवर हल्ला करणाऱ्या 6 जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. कोरोना काळात काम करणाऱ्या पोलिसांवर हल्ला केल्यानं आता सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

पाहा व्हिडीओ –

थोडक्यात बातम्या-

कोरोना रोखण्यासाठी आता एकमेव पर्याय; राहुल गांधींच्या ‘या’ मागणीने धरला जोर

मुंबई विमानतळावर एअर अॅम्ब्युलन्सची इमर्जन्सी लँडिंग; पाहा व्हिडीओ

…अन् लातुरात चक्क मृतदेहांची अदलाबदल; एकाच मृतदेहावर दोन वेळा अंत्यसंस्कार!

एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची गोंदियात बदली!

कोरोना पॉझिटिव्ह नवरा अन् गुडघ्याला बाशिंग; कोरोनाबाधित असतानाही नवरदेव चढला बोहल्यावर, अन्…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More