बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अभिनेता अक्षय कुमारला मातृशोक; अरुणा भाटियांचं उपचारादरम्यान निधन

मुंबई | प्रसिद्ध बाॅलिवूड अभिनेता अक्षय कुमारवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 8 सप्टेंबर रोजी सकाळी अक्षयच्या आईचं निधन झालं आहे. मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

अक्षयने स्वतः ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. यावेळी माझी आई माझं सर्वस्व होती. मात्र तिने आज सकाळी तिचा शेवटचा श्वास घेतल्याने माझ्यावर आणि माझ्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असल्याचं त्याने ट्विटमध्ये म्हटलं आहे.

आईच्या निधनानंतर आता ती वडिलांना पुन्हा दुसऱ्या जगात भेटायला गेली असल्याचं म्हणत तुम्ही केलेल्या प्रार्थनांचा मी आदर करत असल्याचं अक्षयने म्हटलं आहे. अक्षयच्या आईची प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर दोन दिवसांपासून उपचार सुरु होते. यावेळी अक्षय लंडनवरुन आपली शूटिंग सोडून परतला होता.

दरम्यान, अक्षयसाठी त्याचं काम नेहमीच महत्त्वाचं आहे. त्यामुळे कामावर परिणाम न होऊन देण्याच्या उद्देशाने त्याने निर्मात्यांना शूटींग सुरु ठेवण्यास सांगितलं आहे. तसेच ज्या सिन्समध्ये त्याची गरज नाही ते सिन्स शूट करुन घ्यावेत. त्यानंतर तो शूटिंगला पुन्हा परतेल, असं त्याने निर्मात्यांना सांगितलं आहे.

पाहा ट्विटः

,

थोडक्यात बातम्या-

… म्हणून मी शरद पवारांच्या विरोधात बोलतो- गोपीचंद पडळकर

धक्कादायक! शिखर धवनचा पत्नी आयेशा मुखर्जीसोबत घटस्फोट

ह्रदयद्रावक! चारा आणायला गेलेल्या 2 भावांचा विजेचा धक्का लागून मृत्यू

“आता दयामाया नाहीच, फेरिवाल्यांचा उच्छाद अटोक्यात आणावाच लागेल”

“बेळगावात मराठी माणसाचा पराभव झाल्यावर भाजप पुढाऱ्यांनी पेढे वाटले, हे दु:ख टोचणारं”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More