बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनायोद्धा म्हणण्यापेक्षा आमच्या मागण्या मान्य करा म्हणत परिचारिकांचं आंदोलन!

मुंबई | जगभरात कोरोना संसर्गाने थैमान घातलं आहे. त्यामुळे अनेक देशांनी लसीकरणावर भर देण्यास सुरुवात केली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी कोरोनायोद्धा अहोरात्र मेहनत घेत आहेत. अशातच फक्त कोरोनायोद्धा म्हणण्यापेक्षा आमच्या मागण्या मान्य करा, असं म्हणत महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेकडून कामबंद आंदोलन पुकारण्यात आलं आहे.

मुंबईतील जे.जे. रुग्णालयातील 375 परिचारिकांनी कामबंद आंदोलन पुकारलं आहे.  महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेकडून आज आणि उद्या दिवसभर कामबंद आंदोलन केलं जाणार आहे. मागील दोन दिवस परिचारिकांनी विविध मागण्यांसाठी सकाळी दोन तास काम बंद आंदोलन केलं होतं. मात्र या आंदोलनानंतरही राज्य सरकारकडून दखल न घेतली गेल्यानं परिचारिकांनी आता आक्रमक पवित्रा घेत दोन दिवसीय कामबंद आंदोलन पुकारलं आहे.

परिचारिकांनी काही मागण्या केल्या होत्या यामध्ये कोरोना काळात बंद करण्यात आलेली साप्ताहिक रजा पुन्हा सुरू करावी, आरोग्य विभागात परिचारिकांच्या कायमस्वरुपी पदभरती करा, कोरोनामध्ये 7 दिवस काम आणि तीन दिवस अलगीकरण रजा कायम ठेवावी, केंद्राप्रमाणं जोखमी भत्ता, अशा काही प्रमुख मागण्यांसह परिचारिकांनी दोन दिवस आंदोलन पुकारलं आहे.

दरम्यान, कोरोना महामारीच्या काळात परिचारिकांनी पुकारलेल्या संपामुळे रुग्णांचे हाल होण्याची दाट शक्यता आहे. मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत आंदोलनाचा इशारा देखील परिचारिकांनी दिला आहे.

थोडक्यात बातम्या – 

“केंद्रातील मोदी सरकार घालवल्याशिवाय देशातील शेतकऱ्यांसह, कष्टकऱ्यांचे अच्छे दिन येणार नाही”

कंगना रणौतनं केली देशाचं नाव बदलण्याची मागणी, म्हणाली….

“2024 मध्ये जनता मोदी सरकारला पायउतार केल्याशिवाय राहणार नाही”

‘…अन्यथा आम्ही उग्र आंदोलन करु’; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारला इशारा

लॉकडाउनमुळे रिचार्ज न करू शकणाऱ्यांना ‘या’ कंपनीकडून मिळणार मोफत रिचार्ज!

महाविकास आघाडीत ठिणगी?, भुजबळ तातडीने मुख्यमंत्र्यांची भेट घेणार!

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More