बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लता मंगेशकर यांच्या नावानं ‘या’ ठिकाणी उभारणार संगीत अकादमी आणि संग्रहालय

नवी दिल्ली । भारताच्या गानकोकिळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लता मंगेशकर यांचं काल सकाळी निधन झालं. मुंबईतील ब्रिच कॅडी रुग्णालयात वयाच्या 93 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे संपूर्ण देशभरात लतादीदींच्या जाण्यानं शोककळा पसरली आहे. अशातच मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी एक मोठी घोषणा केली आहे.

बॉलिवूडच नाही तर सगळ्याच सोशल मीडियावरुन त्यांना श्रध्दांजली देण्यात येत आहे. इंदूरमध्ये स्व. लता मंगेशकर यांच्या नावानं संगीत अकादमी स्थापन केली जाणार असल्याची माहिती मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी लतादीदींच्या नावाने संगीत विद्यापीठ सुरु करणार असून त्यांचे स्मारक उभारण्यापर्यंत अनेक म्हत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.

लतादीदी या केवळ संगीत विश्वापर्यंतच मर्यादित नसून त्यांनी देशभक्तीच्या प्रेरणाही दिल्या आहेत. लतादीदींच्या वाढदिवसाच्या दिवशी दरवर्षी लता मंगेशकर पुरस्कार दिला जाणार, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. इंदूरमध्ये लतादीदींचा पुतळा उभारला जाणार असल्याचीही घोषणा यावेळी मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी केली. संगीत विद्यापीठात मुलांसाठी त्यांची सर्व गाणी संग्राहलयात उपलब्ध असणार आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे.

स्वर कोकिळा लता मंगेशकर आता आपल्यात नाहीत. दीदी तुमच्या शिवाय हा देश उजाड झाला आहे. तुम्हाला संगीताची देवी मानून तुमची उपासना करत राहीन, असं ही चौहान यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

राजेश्वरीच्या सिल्क साडीवर खिळल्या नजरा, हा Hot डान्स पाहाल तर पाहातच राहाल!

‘बाळासाहेबांनी लतादीदींना दिलेली राजकारणात येण्याची ऑफर’; वाचा ‘तो’ भन्नाट किस्सा

लता मंगेशकर व्हेंटिलेटवर असतानाही ऐकत होत्या ‘या’ व्यक्तीची गाणी

‘या’ ठिकाणी भारतीय लष्कराचे सात जवान अडकले, रेस्क्यू ऑपरेशन सुरू

शाहरुख खानला ट्रोल करणाऱ्यांना उर्मिला मातोंडकरचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More