Top News खेळ

कर्णधार विराट कोहलीच्या नावे नवा विक्रम; धोनीलाही टाकलं मागे

ऑस्ट्रेलिया | ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला आज सुरुवात झालीये. भारत पहिल्यांदा फलंदाजीसाठी मैदानात उतरला असता भारताची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. दरम्यान अजिंक्य रहाणे आणि विराट कोहलीने डावाला सावरलं.

कर्णधारपदाला साजेशी खेळी करत विराट कोहलीने अर्धशतक झळकावलंय. या अर्धशतकी खेळीमुळे विराटने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या यादीत पहिलं स्थान पटकावलंय.

हा विक्रम आपल्या नावे करताना विराटने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला मागे टाकलंय. विराटने धोनीचा 813 धावांचा विक्रम मोडीत काढलाय.

महेंद्रसिंग धोनीच्या अगोदर हा विक्रम सौरव गांगुलीच्या नावे होता. सौरव गांगुलीने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये कर्णधार म्हणून 449 धावा केल्या होत्या.

थोडक्यात बातम्या-

संजय राऊत यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी; प्रविण दरेकर यांची मागणी

‘ही’ माझी वैयक्तिक भूमिका; महाविकास आघाडीची नाही- अजित पवार

ब्रेकिंग न्यूज, बार्किंग न्यूज होता कामा नये- उद्धव ठाकरे

‘अहंकाराचा प्रश्न न करता आरेत काम सुरू करावं’, असं म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचं उत्तर

…तर लग्नाचं वचन देऊन केलेलं सेक्स म्हणजे बलात्कार असं नाही- उच्च न्यायालय

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या