बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

म्हैसाळमधील 9 जणांच्या आत्महत्याप्रकरणी अत्यंत धक्कादायक खुलासा!

सांगली | महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या सांगली जिल्ह्यातील म्हैशाळ आत्महत्या प्रकरणी तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्या 9 जणांची आत्महत्या नसून हत्याकांड असल्यांची धक्कादायक बाब समोर आली आहे. हे हत्याकांड गुप्तधनासाठी करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

राज्याला हादरवून टाकणारी घटना सांगली जिल्ह्यातील म्हैशाळ गावात घडली. म्हैशाळमधील एकाच कुंटूबांतील 9 जणांनी विष पिऊन आत्महत्या केल्याची बातमी समोर आली होती. हे सर्वजण उच्चशिक्षित होते, माणिक वनमोरे पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत तर त्यांचे बंधू पोपट वनमोरे शिक्षक आहेत दोघांनी आपली आपल्या आई, पत्नी व मुलांच्या समवेत सामूहिक आत्महत्या केल्याने एकाच खळबळ उडाली होती.

पोलिसांच्या प्राथमिक अंदाजात ही आत्महत्या सावकारी कर्ज असल्याने कारणातून केल्याचं समोर आलं होतं. मृत माणिक वनमोरे आणि पोपट वनमोरे यांच्या खिशात काही सावकारांची नावे असलेली चिठ्ठी सापडल्याने त्याच्यांवर कारवाई करण्यात आली होती. त्याचबरोबर गुप्तधनाच्या लालसेपोटी कुटुंबाने पैसे एक मांत्रिकावर लुटवले होते अशाही चर्चा होत्या.

याप्रकरणी अब्बास महमदअली बागवान वय 48 वर्षे. रा मुस्लिम बाशा पेठ,लेगाव रोड, सरवदेनगर सोलापुर आणि धीरज चंद्रकांत सुरवशे वय ३० वर्षे रा. वसंत विहार ध्यानेश्वरी नगर, प्लॉट नं ५९ जुना पुणा नाका, सोलापूर यांना अटक करण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या

पत्रकारांच्या गोटात खळबळ उडवून देणारी बातमी, ‘या’ पत्रकाराला अटक!

महाराष्ट्राच्या सत्तानाट्यात ‘ही’ आहे भाजपची भूमिका, मुनगंटीवार म्हणतात…

शिंदे-ठाकरेंमध्ये सत्तासंघर्ष सुरु, इकडे दोन कलाकारांमध्ये वातावरण पेटलं!

शिवसेनेला आणखी एक झटका!, माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांचं मोठं वक्तव्य

मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाचा महाविकास आघाडीला झटका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More