बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सिंचन घोटळा प्रकरणात ट्विस्ट, अजित पवारांच्या अडचणी वाढणार?

मुंबई | जलसंपदा विभागाच्या सिंचन प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार झाला असा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर होता. याप्रकरणी पवार यांना क्लिनचीट मिळाल्याचं सांगितलं जातंय. आता या प्रकरणी महत्त्वाची माहिती समोर आलीये.

कारवाईचे केवळ नाटक करण्यात आलं, मात्र आरोपींवर अद्यापही कोणतीच कारवाई झालेली नाही. सिंचन योजनेत मोठा अपहार होऊनही कारवाई झाली नाही हे सर्व धक्कादायक असल्याचं माजी मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे माजी मुख्य अभियंता यांच्या आरोपामुळे अजित पवारांच्या अडचणी वाढतील का हे पहावं लागणार आहे.

सिंचन घोटाळा प्रकरणात अजित पवार यांना नागपूर खंडपीठाने क्लिनचीट दिली असली तरी खंडपीठाने अद्यापपर्यंत ती मान्य केलेले नाही. त्यामुळे भविष्यात काहीही होऊ शकते असंच पांढरे यांनी सूचित केलं आहे.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More