बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आर्यन खान प्रकरणाला नवं वळण, रेव्ह पार्टीतील ‘तो’ व्हिडीओ आला समोर

मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या अटकेत आहे. आर्यनच्या अटकेनंतर देशभरातून प्रतिक्रिया येत आहेत. एनसीबीनं मोठी धाड टाकत मुंबई-गोवा-मुंबई क्रुझवरुन ड्रग्ज घेणाऱ्यांना अटक केलं आहे. यामध्ये आर्यन खानचाही समावेश आहे. अशातच आता या क्रुझवर होणाऱ्या रेव्ह पार्टीचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

एनसीबीनं आर्यनला ताब्यात घेतल्यापासून अनेक गोष्टींचा खुलासा झाला आहे. यातच आता या पार्टीतील एक व्हिडीओ समोर आला आहे. काही क्षणांतच हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. आता या प्रकरणात आणखी काय समोर येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दिल्लीतील एका इव्हेंट एजन्सीनं क्रूझवर असलेल्या युवकांसाठी ‘नमसक्रे’ कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. शेकडो लोकांनी यात सहभाग घेतला होता. याठिकाणाहून आर्यनसह 8 जणांना अटक केली आहे.

दरम्यान, क्रुझवर छापा घातला तेव्हा आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धामीचा यांच्यासह आठ जणांना ताब्यात घेतलं. तर दुसऱ्यांदा जेव्हा छापा घातला तेव्हा देखील आणखी आठ जणांना अटक करण्यात आली. आर्यनला 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबीच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालायनं सोमवारी दिले आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

थोडक्यात बातम्या –  

देशातील कोरोना रूग्णसंख्येत चढउतार सुरूच; 7 महिन्यातील सर्वात कमी बाधितांची संख्या

पुढील 4-5 दिवस ‘या’ भागांत मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा

पेट्रोल-डिझेलच्या किंमतींचा पुन्हा भडका, सर्वसामान्य नागरिक त्रस्त

NCBच्या क्रुझ पार्टीवरील कारवाईचं गोव्याच्या मुख्यमंत्र्याकडून स्वागत, म्हणाले…

“तालिबानी सरकार आणि योगी सरकार यांच्यात फक्त दाढीचा फरक”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More