बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

टुलकिट प्रकरणाला नवं वळण; दिल्ली पोलिसांची ट्विटर इंडियाला नोटीस

नवी दिल्ली | भाजपचे प्रवक्ता संबित पात्रा यांनी एक कथित टुलकिट प्रकरण उघडकीस आणलं होतं. या प्रकरणात काँग्रेस टुलकिट वरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्याचा कट रचत असल्याचा आरोप संबित पात्रा यांनी केला होता. काँग्रेस कोरोनाच्या भारतीय स्ट्रेनचा उल्लेख मोदी स्ट्रेन म्हणून करत आहे, असा आरोप देखील त्यांनी केला होता. त्यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये चांगलीच शाब्दिक टीका झाली होती. त्यानंतर या प्रकरणाला आता नवं वळण लागलं आहे.

संबित पात्रा यांच्या ट्विटखाली ‘मॅनिपुलेटेड मीडिया’ असं ट्विटरकडून लिहण्यात आलं होतं. टूलकिट प्रकरणाचा तपास करण्यासाठी सोमवारी दिल्ली पोलीस स्पेशल सेलच्या दोन टीम ट्विटर इंडियाच्या कार्यालयात गेल्या होत्या. स्पेशल सेलची एक टीम दिल्लीतील लाडो सराय कार्यालयात गेली होती. तर दुसरी टीम गुडगावच्या कार्यालयात पोहोचली होती. परंतू कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाडो सराय कार्यालय बंद होतं. त्यामुळे तपास न करताच टीम परतली आहे.

नोटीस देण्यासाठी योग्य व्यक्ती कोण आहे का? हे जाणून घ्यायचं होतं, असंही दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. ट्विटर इंडियाच्या प्रमुखांचं उत्तर अस्पष्ट असल्यानं आम्हाला इथं यावं लागलं असंही त्यांनी सांगितलं आहे. यापूर्वी देखील दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं ट्विटर कंपनीला नोटीस पाठवली आहे आणि मॅनिपुलेटेड मीडियाबाबत स्पष्टीकरण मागितलं आहे.

दरम्यान, एखादी माहिती, फोटो, व्हिडीओ किंवा पत्रक सोशल मीडियावर व्हायरल होत असेल आणि त्याला योग्य प्रकारे साभार देण्यात आला नाही तर, ट्विट त्याला मॅनिपुलेटेड मीडिया असा टॅग देतात. संबित पात्रा यांच्या ट्विटला देखील असाच टॅग देण्यात आला होता. या प्रकरणात आता चांगलाच वाद रंगला आहे. मोदी सरकार अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करत असल्याची टीका विरोधीपक्षांकडून करण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या-

दिलासादायक! महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांसह मृतांच्या संख्येतही घट, जाणुन घ्या आकडेवारी

मुंबईत आमदाराच्या पत्नीनं आत्महत्येचा प्रयत्न केल्यानं खळबळ, ‘हे’ दिलं कारण!

काळजाचा थरकाप उडवणारी घटना! बापानेच अल्पवयीन मुलांच्या डोक्यात दगड घालून केली हत्या त्यानंतर…

भारताचा सर्वात जवळचा मित्र असलेल्या ‘या’ देशाला मुंबई महापालिकेचं लसींसाठी साकडं

संजय राऊतांना काही कामधंदा नाही- देवेंद्र फडणवीस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More