बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! काँग्रेस खासदार राजीव सातव यांच्या शरीरात ‘हा’ नवा व्हायरस, आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

जालना | काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांची प्रकृती पुन्हा खालवली असल्याची समोर आली होती. काही दिवसांपुर्वी सातव यांनी कोरोनावर मात केली होती. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देणार अशा चर्चा असतानाच त्यांची पुन्हा प्रकृती खालावली. मात्र अशातच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीव सातव यांच्या प्रकृतीबाबत नवी आणि धक्कादायक अशी माहिती दिली आहे.

राजीव सातव यांची प्रकृती थोडी नाजूक आहे. डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत आहेत. ते व्हेंटिलेटरवर आहेत. राजीव सातव बरे होत असताना त्यांच्या शरीरात सायटोमॅजिलो हा नवा व्हायरस सापडला. त्यांच्यावर उपचार सुरु असून इन्फेक्शनही झालं आहे. त्यामुळे परिस्थिती थोडी नाजूक आहे. पण डॉक्टर पूर्णत: प्रयत्न करत आहेत, काळजी घेत असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

सर्व उपचार केले जात असून तज्ज्ञातले तज्ज्ञ डॉक्टर बोलावून आपल्या मराठवाड्यातील या सुपुत्रावर उपचार केले जात आहेत. मुंबई-पुण्यातील तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत सातव यांच्यावर उपचार सुरु आहेत. मी स्वत: उद्या त्यांना भेटण्यासाठी जात आहे. त्यांची काळजी घेण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात असल्याचं राजेश टोपे म्हणाले.

दरम्यान,  राजीव सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. गेल्या 23 दिवसांपासून सातव व्हेंटिलेटरवर आहेत. मुंबईतील डॉक्टरांची टीमही सातव यांच्यावर उपचार करण्यासाठी येऊन गेली. याशिवाय काँग्रेसच्या अनेक नेत्यांनीही पुण्यातील रुग्णालयात जाऊन विचारपूस केली आहे.

थोडक्यात बातम्या- 

“पांढऱ्या पायाचं सरकार आलं आणि मराठा समाजाचं आरक्षण रद्द झालं”

पोलिसासोबत संबंध ठेवण्यासाठी सराफाची पत्नी करायची असं काही; काळजाचा थरकाप उडवणारी घटना

घरजावई असलेल्या पती आणि पत्नीचे रात्री झालं भांडण, सकाळ होताच समोर आला धक्कादायक प्रकार

“अभिनंदन! पंतप्रधान होण्याच्या दिशेने तुम्ही पहिलं पाऊल टाकलंत”

“कोरोना काळात कामासाठी फडणवीस आणि माझ्याइतकं कोणताच नेता फिरला नसेल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More