देश

डॉक्टरांनी उपचारास नकार दिल्याने नवजात बाळाचा मृत्यू

कोलकाता | डॉक्टरांनी उपचार करण्यास नकार दिल्याने नवजात बाळाचा मृत्यू झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांनी पुकारलेल्या संपामुळे गेल्या चार दिवसांपासून वैद्यकीय सेवा पुर्णपणे विस्कळीत झाली आहे.

डॉक्टराच्या संपामुळे आपल्या नवजात बाळाला योग्य वेळी उपचार न मिळाल्याने बाळाचा मृतदेह हातात घेऊन एक व्यक्ती रडताना दिसत आहे. याबाबत कोलकातामधील आनंदबाजार या बंगाली वृत्तपत्राच्या फोटोग्राफरने ट्वीट करत एक फोटो शेअर केला आहे.

कोलकातामध्ये एका जुनिअर डॉक्टरला रूग्णाच्या नातेवाईकांकडून झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ शासकिय रूग्णालयातले मार्डचे डॉक्टर संपावर गेले आहेत.

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये डॉक्टारांनी पुकारलेला संप आता देशभरात पसरला असून दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि इतर राज्यांमधील रूग्णसेवेला याचा फटका बसला आहे.

महत्वाच्या बातम्या

-रामराजेंकडून उदयनराजेंची पिसाळलेल्या कुत्र्याशी तुलना

-“देशात आज राजेशाही असती तर मी दुष्काळ निवारणाचा निर्णय घेऊन मोकळा झालो असतो”

-रोहित पवार यांच्या उमेदवारीला विरोध; यांना उमेदवारी देण्याची मागणी!

आरक्षणामुळे लोकशाही संपुष्टात येत आहे- उदयनराजे भोसले

-गुन्हा दाखल झाल्यावर आणि कोर्टाने दिलासा दिल्यावर धनंजय मुंडेंचं आक्रमक ट्वीट

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या