नागपूर | नागपूरच्या मेयो रूग्णालयातील कोरोनाच्या पाच संशयित रूग्णांनी पळ काढला आहे. त्यामुळे आता हे रूग्ण शहरातील इतर लोकांच्या संपर्कात आल्यास मोठा धोका निर्माण होण्याची शक्याता आहे.
रात्री उशीरा तीन पुरुष आणि दोन महिला रुग्णांनी इंदिरा गांधी वैद्यकीय रुग्णालयातून पळ काढला. यानंतर पोलिसांनी तातडीने या रुग्णांचा शोध सुरु केला. या संशयित रूग्णांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं होतं.
पोलिसांना पाचपैकी तिघेजण त्यांच्या घरी आढळून आले. यानंतर पोलिसांनी त्यांना शनिवारी रुग्णालयात पुन्हा परतण्याची विनंती केल्याचं कळतंय.
दरम्यान, हे सर्वजण स्वच्छतागृहाला जाण्याच्या बहाण्याने एकापाठोपाठ एक रुग्णालयातून बाहेर पडले, अशी माहिती पोलिसांना दिली आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
कला, क्रीडा शिक्षकांच्या नियुक्तीसाठी सर्वंकष धोरण आणणार- बच्चू कडू
…म्हणून बिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्टच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिला!
महत्वाच्या बातम्या-
मोदी सरकारकडून पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्कात वाढ
भारतात 11 रुग्णांचा कोरोनाशी यशस्वी लढा
राष्ट्रवादी सोडल्यापासून उदयनराजेंच्या संपत्तीत इतकी घट!
Comments are closed.