Maharashtra l राज्य सरकारने अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता सर्व सरकारी कागदपत्रांवर आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय राज्य सरकारच्यावतीने घेण्यात आला आहे. सरकरने घेतलेल्या या नियमाची अंमलबजावणी येत्या सहा महिन्यात घेण्यात येणार आहे. त्यामुळे आता कागदपत्रांवर आईचे देखील नाव असणार असणार आहे.
सातबाऱ्यावर आईचे नाव बंधनकारक :
राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे कागदपत्रांवर महिलांच्या देखील नावाचा समावेश करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे आता सातबाऱ्यावर अर्जदाराच्या नावानंतर त्याच्या आईच्या नावाचा देखील समावेश करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे. मात्र या निर्णयासाठी राज्य सरकारने काही नियम लागू केले आहेत.
राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार, 1 मे 2024 नंतर जन्मलेल्या व्यक्तीच्या नावावर जमीन खरेदी केल्यानंतर सातबाऱ्यावर अर्जदारासोबत आईच्या नावाचा देखील समावेश होणार आहे. याशिवाय पूर्वीच्या व्यक्तीच्या नावासोबतच आईच्या नावाचा समावेश देखील करावा लागणार आहे. त्यासाठी सरकार येत्या सहा महिन्यांत या नियमाची अंमलबजावणी सुरू करणार आहे.
Maharashtra l राज्य सरकारने घेतला निर्णय :
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, राज्य सरकारच्या महिला व बालकल्याण विभागाने गेल्या काही महिन्यांपूर्वी महिलांच्या नावाचा म्हणजेच आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. बालकल्याण विभागाच्या त्याच अनुषंगाने 1 मे 2024 नंतर जन्माला आलेल्या बालकाच्या नावे जमीन, सदनिका खरेदी केल्यास त्याच्या नावासह आईच्या नावाचा उल्लेख करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. तसेच या संदर्भात आता संगणकप्रणाली राबविण्याची प्रक्रिया देखील भूमी अभिलेख विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे.
मात्र यासाठी संबंधित व्यक्तीला काही पुरावे सादर करावे लागणार आहेत. त्यामध्ये ती महिला त्याची आई असल्याचा पुरावा देणं बंधनकारक असणार आहे. तसेच त्यानंतर त्या व्यक्तीच्या नावासोबत आईचे नाव लावले जाणार आहे. या गोष्टी करताना अर्जदाराला पुरावे दाखल करावे लागणार आहेत. त्यानंतर तलाठ्यामार्फत शहानिशा करून नोंद होणार आहे.
News Title – A Person Born After May 1, 2024 Will Have The Mother’s Name Included On The Satbara Big Decision Of Land Records Department
महत्त्वाच्या बातम्या-
पुणे अपघात प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा पोलिसांना नवा आदेश; मंत्री-आमदार-खासदार सगळेच अडचणीत!
…म्हणून अभिनेता इम्रान खानने केला घटस्फोट; तब्बल 5 वर्षांनी केला खुलासा
मलायकाने भररस्त्यात केलं असं काही की… व्हिडीओ तूफान व्हायरल
तुला पाहिजे तेवढे पैसे घे; कल्याणीनगर अपघात प्रकरणात मोठा ट्विस्ट
मनोज जरांगे विरोधात ‘त्या’ तरुणाने असं काय केलं?…म्हणून बसला बेदम चोप