Manoj Jarange l राज्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्याबद्दल एका व्यक्तीने आक्षेपार्ह पोस्ट केली होती. अशातच काल रात्री साडेअकराच्या सुमारास जमावाने त्या व्यक्तीला घरातून बाहेर काढत बेदम मारहाण केली आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
मनोज जरांगे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला मारहाण :
मराठा समाजाचे आंदोलन करणारे मनोज जरांगे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला छत्रपती संभाजीनगरमध्ये मारहाण करण्यात आली आहे. आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणाचे दीपक बद्री नागरे असे नाव आहे. दीपक बद्री हा दुपारी मनोज जरांगे यांची भेट घेऊन परत आला होता. त्यानंतर त्याने जरांगे यांच्यासोबचा सेल्फी स्टेटसला ठेवताना एका ओळीचा आक्षेपार्ह मजकूर लिहल्याचा आरोप मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे.
तसेच दिपकच्या व्हाट्सअँप स्टेटसचा स्क्रीनशॉट देखील तुफान व्हायरल झाला आहे. तसेच जमावाने वादग्रस्त स्टेटस ठेवणाऱ्या दीपक विरोधात मुकुंदवाडी पोलिसांत गुन्हा देखील दाखल केला आहे. याशिवाय दीपकला जमावाने मारहाण केल्याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.
Manoj Jarange l याप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल :
छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या विषयी आक्षेपार्ह पोस्ट असल्यामुळे मुकुंदवाडी परिसरामध्ये तब्बल 200 ते 250 जणांचा जमाव जमा झाला होता. त्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणाच्या घराची शोधाशोध सुरू झाली आणि त्यानंतर पोस्ट करणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण केली आहे.
मुकुंदवाडी येथे राहत असलेल्या तरुणाला आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी मारहाण केली आहे. यावेळी त्याला मुकुंदवाडी पोलीस ठाण्यामध्ये हजर करण्यात आलं आहे. यासंदर्भात नवनाथ डांगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दीपक नागरे या तरुणाविरुद्ध मुकुंदवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. अशातच आता या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवाजी तावरे करत आहेत.
News Title – A person who made an offensive post against Manoj Jarange was brutally beaten
महत्त्वाच्या बातम्या-
मासिक पाळीदरम्यान ‘या’ अभिनेत्रींना होतो प्रचंड त्रास; केली मोठी मागणी
कॅशबॅकपासून बिल भरण्यापर्यंत, या 4 बँकांनी बदलले क्रेडिट कार्डचे नियम; काय परिणाम होणार?
कालीचरण महाराजांच्या वक्तव्याने नवा वाद
या राशीच्या व्यक्तींनी आज भांडणात सहभाग घेऊ नका
..तर तुम्हीही ठरू शकता उष्माघाताचे बळी; ‘अशी’ घ्या स्वतःची काळजी