बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

करुणा शर्मांच्या गाडीत पिस्तुल आढळलं, पोलिसांकडून तपास सुरु

बीड | राज्यात गेल्या दिवसांपासून करूणा शर्मा खूप चर्चेत आहेत. परळीतील वैद्यनाथ मंदिरात दर्शन घेण्यासाठी त्या आज बीडमध्ये दाखल झाल्या. तेव्हा करूणा शर्मा यांच्या भोवती लोकांनी घेराव घालण्याचा प्रयत्न केला.  त्यानंतर करूणा शर्माच्या गाडीत पोलिसांना पिस्तूल आढळून आल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे.

बीडमधील वैद्यनाथ दर्शनासाठी करूणा मुंडे गेल्या होत्या. मात्र या ठिकाणी आमच्या साहेबाला बदनाम करायला आलात का?, असा प्रश्न करत परळीच्या महिलांनी करूणा शर्माला अडवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्या ठिकाणी पोलीस पोहोचले आणि करूणा शर्मा यांची तपासणी केल्यानंतर त्यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आलं.

करूणा शर्माच्या गाडीत आढळून आलेले पिस्तूल हे त्यांचेच आहे का? तसेच त्या पिस्तूलाचं त्यांच्याकडे लायसन्स आहे का? याबाबतीत पोलीस अधिक तपास करीत आहेत. वैद्यनाथ मंदिराजवळ स्थानिक लोकांनी करूणा मुंडे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या प्रकरणाबाबत आता चौकशी नंतर पोलीस काय भूमिका घेतात, हे आता पहावं लागणार आहे.

दरम्यान, करूणा शर्मा आज परळीत पत्रकार परिषद घेऊन गौप्यस्फोट करण्याच्या तयारीत होत्या. परंतु पत्रकार परिषदेपूर्वीच त्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केल्यानं आता नवीन वादाला तोंड फुटल्याचं पहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या- 

पत्रकार परिषदेपूर्वी करूणा शर्मा मुलासह स्थानबद्ध; परळीत तणावाचे वातावरण

‘… त्यांनी थोडसं तारतम्य बाळगावं’; शरद पवारांचा ‘त्या’ नेत्यांना सल्ला

डिवचू नका नाहीतर सोडणार नाही’; शिवसेनेचा राष्ट्रवादीला थेट इशारा

मोठी बातमी! रवी शास्त्री यांना कोरोनाची लागण; भारतीय संघातील ‘हे’ तीन जण विलगीकरणात

आंदोलन करायचं असेल तर कोरोना विरोधात करा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More