मुंबई | दक्षिण मुंबईत एका तरुणाने भावाला नेत्याची जागा घेता यावी याकरता मोठा कट रचला होता. नेत्याच्या गाडीमध्ये अंमली पदार्थ ठेवून त्याला फसवण्याचा प्रयत्न केला. पण मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने त्याचा हा प्रयत्न हाणून पाडला आहे.
राजकारणात बऱ्याचवेळा पदासाठी, सत्तेसाठी चुकीच्या पद्धतीचा वापर केला जातो. अशाचप्रकारे एका तरुणाने नेत्याच्या गाडीमध्ये बदनामीकरता अंमली पदार्थ ठेवले होते. याप्रकरणी शुक्रवारी अब्दुल अझीझ उर्फ अझ्झूला या तरूणाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आता मुंबई पोलिसांनी एकूण 5 जणांना अटक केली आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या आझाद मैदान युनिटने ही कारवाई केली आहे.
दोघांकडून मेफ्रेडाॅन जप्त करण्यात आले होते त्यांनी अझ्झूचे नाव घेतलं होतं. अशी माहिती मीडिया अहवालात देण्यात आली आहे. त्यांच्यावर कलम 120 बी आणि एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या प्रकरणातील आरोपी असीफ सरदार आणि अझ्झू हे अंमली पदार्थ सेवनाविरोधात काम करणाऱ्या एका एनजीओसाठी काम करतात.
दरम्यान, याप्रकरणी ज्यांची नावं समोर आली आहेत त्यांच्याकडून अधिक तपास मुंबई पोलिसांकडून केला जात आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अझ्झू या आरोपीने असं म्हटलं होतं की काही बिल्डर्स आणि उद्योजक या नेत्याच्या हस्तक्षेपामुळे त्रस्त होते आणि त्यामुळे त्यांना त्याचे अस्तित्व संपवायचं होतं.
थोडक्यात बातम्या –
रेल्वेत आढळली बेवारस बॅग, खोलून पाहताच अधिकाऱ्यांचे डोळे झाले पांढरे!
धक्कादायक! तृतीयपंथीयांनी वाहतूक पोलिसाला मारहाण करत गणवेशही फाडला
15 दिवसांपूर्वी तुरुंगाबाहेर आलेल्या कुख्यात गुंड शरद मोहोळला पुन्हा अटक!
हजारो कोटी चुकून ट्रान्सफर; ‘या’ बँकेच्या चुकीनं भल्याभल्यांची झोप उडाली!
भाजपचं 24 फेब्रुवारीला राज्यात 287 ठिकाणी जेलभरो आंदोलन- चंद्रशेखर बावनकुळे